शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

‘शेती’साठी दिल्लीला धडक गरजेची, आर्थिक धोरणामुळे शेती उद्ध्वस्त- पी. साईनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:52 IST

कोल्हापूर : गेल्या २५ वर्षांमधील आर्थिक धोरणांमुळे शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. शेती व्यवस्थेवरील सध्याचे अरिष्ट टाळण्यासाठी आता देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीला धडक दे

ठळक मुद्देसंतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टचे व्याख्यान

कोल्हापूर : गेल्या २५ वर्षांमधील आर्थिक धोरणांमुळे शेती आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. शेती व्यवस्थेवरील सध्याचे अरिष्ट टाळण्यासाठी आता देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीला धडक देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी बुधवारी येथे केले.

येथील संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवनातील मिनी हॉलमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. ‘भारतीय शेती व्यवस्थेचे अरिष्ट’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ म्हणाले, शेतीसह असमानता हे देशासमोरील मोठे संकट आहे. हे संकट गेल्या २५ वर्षांत सरकारने राबविलेल्या आर्थिक धोरणांनी निर्माण झाले आहे.

त्यामुळे शेतकरी, मजुरांचे जीवनासह शेतीव्यवस्था उद्ध्वस्त झाली. मात्र, कार्पोरेट क्षेत्राची भरभराट झाली असून, ती वर्षागणिक वाढत आहे. अशा स्थितीत शेती व्यवस्थेला उभारी देण्यासाठी आता देशातील राज्या-राज्यांमधील शेतकºयांनी संघटितपणे दिल्लीला धडक देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी संसदे सभोवती ठिय्या मारून वीस दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे.

त्यामध्ये पहिले तीन दिवस शेती व्यवस्थेवरील संकट आणि वास्तवाबाबत शेतकºयांनी बोलावे. यानंतर स्वामीनाथन आयोगातील शिफारशी, पाणी संकट, महिला शेतकºयांचे हक्क, कर्जमाफी यावर चर्चा होऊन धोरण निश्चित होण्याची गरज आहे.

या कार्यक्रमात बँक एम्प्लॉईज युनियनतर्फे ‘स्वामीनाथन अहवाल शिफारशी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. शंभरीमध्ये पदार्पण केल्याबद्दल गणपत पाटील यांचा सत्कार झाला.कार्यक्रमास माजी आमदार संपतराव पवार-पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील, प्रकाश जाधव, पापालाल नायकवडी, आनंदराव पाटील, दिलीप लोखंडे, सुवर्णा तळेकर, डॉ. मेघा पानसरे, शिवाजीराव परूळेकर, आदी उपस्थित होते.पी. साईनाथ म्हणाले,हमीभाव देणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या आश्वासनाचा केंद्र सरकारला विसर.सरकारी शाळा बंद झाल्यास शेतकरी, कष्टकºयांच्या मुलांचे शिक्षण संपणार.किती शेतकºयांनी आत्महत्या केल्या, किती उत्पन्न घटले यापेक्षा माणुसकी किती घसरली, याचे मोजमाप व्हावे.गेल्या दोन वर्षांत नॅशनल क्राईम रेकॉर्डने शेतकरी आत्महत्येची आकडेवारीच प्रसिद्ध केली नाही.शेतकºयांसाठीची ‘रिलिफ पॅकेज’ म्हणजे भंपकपणा आहे.कोल्हापुरात बुधवारी संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी अजित पाटील, पापालाल नायकवडी, आनंदराव पाटील, दिलीप लोखंडे उपस्थित होते.