शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

दुर्लक्षामुळे रस्ता राहिला कच्चा

By admin | Updated: November 12, 2014 00:17 IST

नगरसेवकांची डोळेझाक : खड्डे बनले जीवघेणे

कोल्हापूर : नगरोत्थान योजनेमधून महापालिकेने रस्ता केला, पण तो डांबरीकरणाअभावी. या संपूर्ण रस्त्यावर मोठे दगड वापरले आहेत. त्यामुळे हा रस्ता धोकादायक व जीवघेणा बनला असल्याची स्थिती संभाजीनगर परिसरातील बालाजी पार्क ते पाचगावकडे जाणाऱ्या हनुमाननगरपर्यंतच्या रस्त्याची झाली आहे. गेले दोन-अडीच वर्षे हा रस्ता आहे तसाच असून, याकडे महापालिका प्रशासनाबरोबर स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.ड्रेनेजवरील झाकणे ठरली स्पीडब्रेकरहनुमाननगरपासून ते बालाजी पार्क या खराब व कच्चा रस्त्यावरील असलेल्या सुमारे दहा ड्रेनेजवरील झाकणे वरती आली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांबरोबर वाहनचालकांनाही झाकणे धोकादायक बनली आहेत. यासाठी लवकरच नवीन डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.शहरात जाणारा शॉर्टकट रस्ता...हा रस्ता नगरोत्थान योजनेमधून दोन वर्षांपूर्वी करण्यात आला होता; पण या रस्त्यावर मोठे दगड वापरून करण्यात आला. यानंतर हा रस्ता आहे तसा पडून राहिला. गेल्या दोन वर्षांपासून या संपूर्ण रस्त्यावर डांबरीकरण झालेले नाही; मात्र बारीक खडी वापरली नसल्याचे दिसते. बालाजी पार्कसह जरगनगर, रामानंदनगरसह पाचगाव, रायगड व संभाजीनगर मैलखड्डा या परिसरातील वाहनचालकांची शहरात जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नेहमी वर्दळीचा हा रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.अंधार अन् अपघात...खराब रस्त्याबरोबर या मार्गांवरील विद्युत खांबावरील रात्रीच्या वेळेत विद्युत पुरवठा खंडित आहे. त्यामुळे या काळोखाच्या अंधारात या रस्त्यावरून जाताना वाटमारीचे प्रकार होत आहे. तसेच मोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो आहे.