शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सलग सुटीमुळे कोल्हापूर पर्यटकांनी बहरले, अंबाबाई, जोतिबावर भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:47 IST

सलग चार दिवसांच्या सुटीमुळे कोल्हापूर शहरासह परिसरातील धार्मिक व पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली आहेत; त्यामुळे एकूणच शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. यासह यात्री निवासही हाऊसफुल्ल झाली आहेत.

ठळक मुद्देविविध धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दीपार्किंगसह हॉटेल, यात्री निवास हाऊसफुल्ल

कोल्हापूर : सलग चार दिवसांच्या सुटीमुळे कोल्हापूर शहरासह परिसरातील धार्मिक व पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली आहेत; त्यामुळे एकूणच शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. यासह यात्री निवासही हाऊसफुल्ल झाली आहेत.उन्हाळ्याची सुटी सुरू झाली की, सर्वांना वेध लागतात ते पर्यटनाचे. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांमुळे एस.टी. बसेस, रेल्वे, खासगी आराम बसेसचेही आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यात गेल्या तीन दिवसांपासून सलग मिळालेल्या सार्वजनिक सुट्या व शाळांना पडलेल्या सुट्यांमुळे शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे फुलून गेली आहेत.

यात करवीरनिवासिनी अंबाबाई देवी, जोतिबा डोंगर, न्यू पॅलेस, किल्ले पन्हाळगड, नरसोबाची वाडी, गगनबावडा, आदी ठिकाणी राज्यासह परराज्यांतील पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत.

सलगच्या सुट्यांमुळे शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, खासबाग, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, चप्पल लेन, पापाची तिकटी, आदी परिसरात पर्यटकांचे जथ्ये फिरतानाचे चित्र गेल्या तीन दिवसांत दिसत आहे.

मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरातील खासगी यात्री निवास, महालक्ष्मी धर्मशाळा, आदींसह घरगुती राहण्याची ठिकाणेही हाऊसफुल्ल झाली आहेत. पर्यटक मोठ्या संख्येने एकाच वेळी शहरात दाखल झाल्याने त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवरही पडला आहे.

शहराच्या प्रमुख मार्गांवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले; तर पार्किंगसाठी बिंदू चौक, ताराबाई रोड, शिवाजी स्टेडियम, आदी परिसरांत जाण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे वाहनधारकांना मार्गदर्शन केले जात आहे.

अंबाबाई मंदिरात देवीदर्शनासाठी सकाळी सहा वाजल्यापासून रांगाच्या रांगा लागल्याचे चित्र रविवारी दिवसभर दिसत होते. यासह जवळचे पर्यटनस्थळ म्हणून टाऊन हॉल संग्रहालय, न्यू पॅलेस येथील छत्रपती म्युझियम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र होते. त्यानंतर नृसिंहवाडी, किल्ले पन्हाळगड, जोतिबा डोंगर असा क्रम पर्यटकांकडून पाहण्यासाठी लावला जात आहे.

कोल्हापूर दर्शन झाल्यानंतर आलेले पर्यटक कोकण, गोवा, आदी ठिकाणी रवाना होत आहेत. त्यामुळे रत्नागिरी, गगनबावडा, राधानगरी या महामार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र आहे.चौथा शनिवार, रविवार आणि बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन अशी सलग चार दिवस सार्वजनिक सुटी असल्यामुळे कोल्हापुरात पर्यटकांची मांदियाळी दिसत आहे. या सर्वांचा विचार करून एस. टी. महामंडळाने मुंबई, पुणेहून येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष जादा १२ गाड्यांची सोय केली आहे.

यात आजरा, गडहिंग्लज, चंदगड, गारगोटी येथे मुंबईहून सुटीसाठी येणाऱ्या संख्या अधिक आहे. यात शिवशाही बसेस सहा, तर पुणेसाठी प्रत्येक डेपोतून दोन बसेस असे जादा बसेसचे नियोजन केले आहे.एक दिवसाची ट्रिप करण्याचे फॅड वाढले आहे. त्यामुळे खासगी बसेस, १६ सीटर गाड्या, छोट्या कार, आदींची मागणी वाढली आहे. यात ठरावीक भाडे ठरवून गोवा, रत्नागिरी, गणपतीपुळे, पावस, गगनबावडा, विजयदुर्ग, मालवण, तारकर्ली, महाबळेश्वर, आदी ठिकाणी जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे असा व्यवसाय करणाऱ्या मंडळींना चांगले दिवस आले आहेत. यात एसी, नॉन-एसी अशा वर्गवारीत किलोमीटरचे दर निश्चित होत आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन