शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

यंदा ‘एफआरपी’ देतानाच होणार दमछाक

By admin | Updated: September 30, 2014 01:05 IST

धुराडी डिसेंबरलाच पेटणार : निवडणुका, दिवाळीचा परिणाम; ऊसदर नियामक मंडळ हवेतच

कोल्हापूर : राज्य सरकारने यंदाचा साखर हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली असली तरी किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी कारखान्यांची धुराडी पेटण्यास १ डिसेंबरच उजाडणार आहे. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूरची ऊस परिषद यंदा १ नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतरच पहिल्या उचलीचा तिढा सुटणार असल्याने हंगाम गतवर्षी प्रमाणेच लांबणार आहे. आताच बाजारातील साखरेचा दर २७५० रुपयांपर्यंत खाली आल्याने यंदा किमान व वाजवी किंमत (एफआरपी) देतानाही कारखान्यांची दमछाक होणार आहे. राज्यातील साखर हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे; परंतु त्याचदिवशी राज्यात विधानसभेचे मतदान आहे. १९ ला मतमोजणी व त्यानंतर लगेच २३ पासून दिवाळी आहे. त्यामुळे दिवाळी झाल्याशिवाय ऊसतोड मजूरही येणार नाहीत. खासदार राजू शेट्टी यांनी १ नोव्हेंबरला जयसिंगपूरला ऊस परिषद घेऊन पहिल्या उचलीची मागणी करण्याचे जाहीर केले आहे. ऊसदर प्रश्नात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने ऊसदर नियामक मंडळाची स्थापना करण्याची घोषणा केली; परंतु त्याचा आदेशच निघाला नसल्याने नवे सरकार आल्यावर नवे मंडळ नेमणार का? याबद्दल गोंधळ आहे. तसेच २७५० रुपये आजचा साखरेचा दर असताना राज्यासाठी सरासरी एफआरपी २२०० रुपये बसू शकेल. पश्चिम महाराष्ट्रासाठी ही एफआरपी २६०० रुपयांपर्यंत जाऊ शकते, कारण उतारा जास्त असतो. बाजारातील साखर दराच्या ८५ टक्के रक्कम राज्य बँक उपलब्ध करून देते. त्यातून कारखान्याचा व्यवस्थापन खर्च व बँकेच्या कर्जाचे हप्ते याचा विचार केल्यास कसेबसे १७०० ते १८०० रुपयेच कारखान्यांच्या हातात राहतील, अशी स्थिती आहे. गतवर्षीही अशीच परिस्थिती होती; परंतु माजी कृषिमंत्री शरद पवार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकारामुळे केंद्र शासनाने अबकारी कर्ज उपलब्ध करून दिल्याने किमान एफआरपीएवढी रक्कम देणे कारखान्यांना शक्य झाले.