शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागासह मैदानाच्या उत्पन्नातून विकास साधू : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 16:53 IST

छत्रपती शिवाजी स्टेडियमचा विकास लोकसहभागासह मैदानातून मिळणाऱ्या उत्पन्न स्त्रोतातून केला जाईल. त्या करीता आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. अशी माहीती शिवाजी स्टेडियम संकुल समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरूवारी दिली. शिवाजी स्टेडियम दुरावस्था प्रश्नी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात बोलाविलेल्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देलोकसहभागासह मैदानाच्या उत्पन्नातून विकास साधू : दौलत देसाई शिवाजी स्टेडियम दुरावस्था प्रश्नी प्रतिपादन

कोल्हापूर :छत्रपती शिवाजी स्टेडियमचा विकास लोकसहभागासह मैदानातून मिळणाऱ्या उत्पन्न स्त्रोतातून केला जाईल. त्या करीता आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. अशी माहीती शिवाजी स्टेडियम संकुल समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरूवारी दिली. शिवाजी स्टेडियम दुरावस्था प्रश्नी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात बोलाविलेल्या बैठकीत ते बोलत होते.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, स्टेडियममधील गाळेधारकांना भाडेवाढीसंदर्भात नोटीस पाठविली जाईल. जे गाळेधारक भाडेवाढ देणार नाहीत.त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जे भाडे जास्त देतील असे भाडेकरू ठेवले जातील. स्टेडियमच्या दर्शनी बाजूस एलईडी जाहीरात फलक लावून त्यातून उत्पन् मिळवले जाईल. याशिवाय मैदानाभोवती स्वतंत्र पे पार्किंग करून त्यातूनही उत्पन्न मिळवले जाईल. मैदान सांस्कृतिक कार्यक्रमाला भाड्याने देवून त्यातून उत्पन्न मिळू शकते. मात्र, हा पर्याय वापरताना सावध भूमिका घेवू.

यासर्व उत्पन्नाच्या स्त्रोतातून स्टेडियमचा विकास करू . यावेळी क्रीडा प्रेमींसोबत झालेल्या चर्चेत पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. यात मैदानाजवळील अशोक पोवार, रामभाऊ कोळेकर यांनी आपल्या घराजवळील (आड)विहीरी सरकारने ताब्यात घ्याव्यात व त्यातून मैदानाला पाणी घ्यावे, असे आवाहन केले. तर क्रीडा शिक्षक आर.व्ही.शेडगे यांनी जयंती नाल्यातील अतिरिक्त पाणी मैदानासाठी वापरता येईल असेही सुचविले.जलतरण तलावाची दुर्दशेबाबतही क्रीडा प्रेमींनी प्रश्न उपस्थित केला. जलतरण तलावाची माहीती देताना जिल्हा क्रीडाअधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी ५० फ्लोटर घेतल्याच्या निदर्शनास आणले. तर तलावाच्या दुरूस्तीचा खर्च २२ लाख रूपये आहे. प्रत्यक्षात संकुल समितीकडे ९.५० लाखाचा निधी उपलब्ध आहे. मात्र, हा निधी अपुरा असल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी देसाई यांनी दुरूस्ती व देखभालसाठी सल्लागार समिती नेमु. त्यानूसार येणाऱ्या खर्चाची तरतुद करू.

विशेषत: जिल्हा नियोजनच्या नाविण्यपुर्ण योजनेतून हा निधी उपलब्ध करता येईल, असे सुचविले. यावेळी झालेल्या चर्चेतून जिल्हाधिकारी देसाई यांनी कोणाकडे निधी मागण्यापेक्षा मैदानातूनच उत्पन्न निर्माण करून त्याचा विकासासाठी वापर करू. अन्य कोणाकडे निधी मागायला नको. याबाबत झालेल्या चर्चेत माणिक मंडलिक, किशोर घाटगे, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, रामेश्वर पतकी, सुहास साळोखे, संभाजीराव जगदाळे यांनी सहभाग घेतला.यावेळी सुरेश पाटील, बाबुराव घाटगे, डॉ. सुरेश फराकटे, दिग्विजय वाडेकर, चंचल देशपांडे, प्रकाश रेडेकर, सतीश पोवार, श्रीधर कुलकर्णी, महादेवराव जाधव, आदी क्रीडाप्रेमी उपस्थित होते. जिल्हाधिकारी देसाई यांच्या या भूमिकेचे क्रीडाप्रेमींनी कौतुक करून स्वागत केले.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर