शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नगररचना विभागामुळे विकासाला खीळ : कोल्हापूर महानगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:45 IST

कोल्हापूर : ‘आम्ही लावू तोच अर्थ’ या न्यायाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचा सावळागोंधळाचा कारभार सुरू असून, यामुळे कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसली

कोल्हापूर : ‘आम्ही लावू तोच अर्थ’ या न्यायाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचा सावळागोंधळाचा कारभार सुरू असून, यामुळे कोल्हापूरच्या विकासाला खीळ बसली असल्याचा आरोप असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅन्ड इंजिनिअर्सचे अध्यक्ष सुधीर राऊत यांनी केला आहे.

या विभागाच्या कारभाराबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी संघटनेने पत्रकार परिषद आयोजित केली होती. याबाबत आयुक्त लेखी स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत कोणतेही बांधकाम व जमीन विकासची प्रकरणे या विभागाकडे परवानगीसाठी सादर न करण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राज डोंगळे, सचिव प्रसाद मुजुमदार, खजानीस बाजीराव भोसले, उमेश कुंभार, सुनील मांजरेकर, मिलिंद नाईक, सुधीर हंजे उपस्थित होते.

कशा पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार चालला आहे, हे सांगताना राऊत म्हणाले, १९४७ पासून कोल्हापूरची हद्दवाढ झाली नाही. राज्यात ‘ड’ वर्गामध्ये १९ महापालिका आहेत. मात्र, केवळ कोल्हापूरमध्येच संस्थानकालीन जमिनीचे प्रमाण म्हणजेच ‘स्पेसिफाई एरिया’चे प्रमाण जास्त असल्याने यासाठीच्या परवानग्या जुन्या नियमावलीनुसार देण्याची स्पष्ट तरतूद असताना नवे नियम लागू केल्याने अशा जागेतील अनेक कामे रखडली आहेत. यामध्ये जागेच्या वादापासूनची सर्व जबाबदारी आर्किटेक्ट, इंजिनिअरवर टाकल्यानेही अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या सहा महिन्यांत १0 टक्के प्रकरणांचीही निर्गत झालेली नसून, २00 प्रकरणे प्रलंबित आहेत.३0 दिवसांत प्रकरणे मंजूर करायचा नियम असताना २९ व्या दिवशी त्रुटी काढल्या जात आहेत. नव्या नियमानुसार ३0 फुटांच्या रस्त्यांची अट घातली गेली असल्याने अनेक रिकाम्या जागा सध्या पडून असून, त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे, असा दावा यावेळी करण्यात आला.संघटनेचे निरीक्षण आणि मागण्यापरवानग्या आॅनलाईन द्या‘एफएसआय’चा पूर्ण वापर होत नसेल, बांधकाम नियमात बसत नसेल, तर सहायक नगर रचनाकार यांना बदल करण्याचे अधिकार असताना त्याचा वापर केला जात नसल्याने प्रकरणे प्रलंबित आहेत.अपवादात्मक प्रकरणे आयुक्तांकडे जाणे अपेक्षित असताना सर्व प्रकरणे त्यांच्याकडे पाठवून वेळेचा अपव्यय होतो.२0/२५ वर्षे व्यवसायात असणाऱ्यांकडूनही दरवर्षी पदवी प्रमाणपत्राची मागणी केली जाते.तिसºया विकास आराखड्याचे काम महापालिकेने हाती घेणे गरजेचे आहे.पुण्यासारख्या शहरात मोठमोठ्या प्रकल्पांना १५ दिवसांत परवानगी मिळत असताना कोल्हापुरातच वेळ का लागतो?कुठल्याही बैठकांचे इतिवृत्त नाहीआमच्या संघटनेसह क्रिडाई व अन्य संघटनांसोबत आयुक्त आणि अन्य अधिकाºयांनी ज्या बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचे इतिवृत्तही आम्हाला उपलब्ध होत नाही. बैठकीत मान्य करण्यात आलेले अनेक मुद्दे अधिकाºयांना अडचणीत आणणारे असल्याने इतिवृत्त दिले जात नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.८0 कोटींवरून महसूल २३ कोटींवरया विभागाचा महसूल वर्षाकाठी ८0 कोटींपर्यंत असतो. मात्र, नगररचना अकार्यक्षम कामाच्या पद्धतीमुळे यंदा केवळ २३ कोटी महसूल जमा झाला आहे. हीच आकडेवारी या विभागाच्या कामाचे द्योतक असल्याचे सांगण्यात आले.जेवढा विलंब तेवढी किंमत वाढते

जेवढे प्रकरण प्रलंबित ठेवले जाते तेवढी त्या प्रकरणाची किंमत वाढत जाते. आपल्याला पाहिजे तसा नियमांचा ‘अर्थ’लावून संबंधितांकडे अव्वाच्या सव्वा रक्कम मागितली जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.

अभियंत्यांना संगणकही सुरू करता येत नाहीएक खिडकी योजनेसाठी अनुभवी अधिकारी, कर्मचारी नेमणे आवश्यक असताना तेथे नवखे अधिकारी, कर्मचारी नेमण्यात आले आहेत. अनेक दिवसांनी प्रकरणे पुढे पाठविली जातात आणि तेथे प्रत्येक टेबलावर त्रुटी काढून प्रकरणे प्रलंबित ठेवली जातात.