सावरवाडी : उन्हाळी हंगामात पेरलेल्या सूर्यफूल पिकांचे बोगस बियाणे लागल्याने करवीर तालुक्यात सूर्यफूल पिकातून शेतकर्यांना आर्थिक फटका बसला. ऐन सूर्यफूल काढणीमध्ये उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर बनला आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत सूर्यफूल पिकाची पेरणी करण्यात आली होती. निकृष्ट दर्जाच्या सूर्यफूल बियाणाचे खासगी बी-बियाणे कंपन्यांद्वारे शेतकर्यांना वाटप करण्यात आले होते. ग्रामीण भागात ऐन उन्हाळा हंगामात सूर्यफूल पीक काढणीस सुरुवात झाली. काढणीच्यावेळी सूर्यफूल पिकाची फुले दाण्यांनी भरली नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने शेतकर्यांना यावर्षी आर्थिक फटका बसला. सूर्यफूल बियाणाची चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. दरम्यान, राज्य शासनाने सूर्यफूल पीक क्षेत्राचा सर्व्हे करून शेतकर्यांना बी-बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्याची मागणी करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. (वार्ताहर)
बोगस बियाणामुळे सूर्यफूल उत्पादनात घट
By admin | Updated: May 13, 2014 18:05 IST