शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कडवी नदीमुळे बांबवडे परिसर होतोय सुजलाम्‌ सुफलाम्‌

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:24 IST

अनिल पाटील सरूड : कडवी नदीवरून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून बांबवडे परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या अनेक गावांमध्ये ...

अनिल पाटील

सरूड : कडवी नदीवरून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून बांबवडे परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या अनेक गावांमध्ये शेतीसाठी पाणी मिळाल्याने या परिसरातील कोरडवाहू असणाऱ्या शेती क्षेत्रासाठी कडवी नदी वरदान ठरत आहे. सध्या बांबवडे परिसरातील आठ गावांतील सुमारे १ हजार एकराहून अधिक शेतीक्षेत्र कडवी नदीवरील उपसा जलसिंचन योजनेद्वारे ओलिताखाली आले आहे. एकेकाळी पाण्याअभावी ओसाड असलेला हा भाग कडवी नदीच्या पाण्यामुळे हळूहळू सुजलाम्‌ सुफलाम्‌ होऊ लागला आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या बांबवडे परिसरातील अनेक गावांत शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षानुवर्षे केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहवे लागत होते.

पावसाळी पिके सोडल्यास पाण्याअभावी या परिसरात बारमाही पीक घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते; परंतु अलीकडील काही वर्षांत बांबवडेसह भाडळे, डोणोली, खुटाळवाडी, सुपात्रे, साळशी, सोनवडे, गोगवे आदी गावांतील काही शेतकऱ्यांनी एकत्रित येत कडवी नदीवरून उपसा जलसिंचन योजनेद्वारे आपापल्या गावात शेतीसाठी पाणी आणल्याने या गावांतील पाण्यापासून वंचित असणारी शेतजमीन हळूहळू ओलिताखाली येऊ लागली आहे.

निनाई परळे येथील कडवी मध्यम प्रकल्पामुळे कडवी नदी बारमाही दुथडी वाहत असल्याने बांबवडे परिसरातील शेतीसाठीही बारमाही पाणी उपलब्ध होत आहे. परिणामी, येथील शेतकरी उसासारखी बारमाही पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे या परिसरातील ऊसलागवडीच्या क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बांबवडे परिसरातील ८ गावांत

२० उपसा जलसिंचन योजना

सध्या या परिसरातील ८ गावांमध्ये २० उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून सुमारे पाच ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कडवी नदीवरून शेतीसाठी पाणी आणण्यात आले आहे. यामध्ये भाडळे येथील १, डोणोली- ६, खुटाळवाडी- २, सुपात्रे- १, साळशी- ३, सोनवडे- १, बांबवडे- १, गोगवे- ५ या उपसा जलसिंचन योजनांचा समावेश आहे. भविष्यात या परिसरातील आणखी काही शेतकरी कडवी नदीवरून उपसा जलसिंचन योजनेद्वारे शेतीसाठी पाणी नेणार असल्याने या परिसरातील ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्रामध्ये आणखी वाढ होणार आहे.