शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘पिशवी बंदी’मुळे दूध १३ रुपयांनी महागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:12 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने पॉलिथीन पिशवी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे हत्यार उपसल्याने त्यांनी उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोल्हापूर : राज्य सरकारने पॉलिथीन पिशवी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचे हत्यार उपसल्याने त्यांनी उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम दूध वितरणावर होणार असल्याने दूध संघांपुढे आता ‘टेट्रा पॅक’व काचेच्या बाटलीचा पर्याय आहे; पण टेट्रा पॅक पॅकिंगमधील दुधाची चव बदलणार आहेच, पण त्यासाठी ग्राहकांना लिटरमागे किमान १३ रुपये जादा मोजावे लागणार आहेत. हा निर्णय दूध संघांची डोकेदुखी वाढवणार आहेच, पण त्याचबरोबर ग्राहकांचा खिशा मोकळा करणाराच आहे.महाराष्टÑ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पॉलिथीन फिल्म उद्योगावर कडक कारवाई केली जाणार असल्याने संबंधित कंपन्यांनी १५ डिसेंबरपासून उत्पादन बंद करण्याचे निर्णय घेतला आहे. या पिशवीतून राज्यातील रोज साधारणत: दोन ते अडीच कोटी लिटर दुधाचे वितरण होते. कंपन्यांनी उत्पादन बंद केले तर दूध वितरणाचा पेच निर्माण होऊ शकतो. याबाबत सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू असली तरी पॉलिथिन पिशवीला पर्याय काय? याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.पहिला पर्याय पूर्वीप्रमाणे काचेच्या बाटलीतून दूध वितरण करावे लागणार आहे; पण ही बाटली हाताळणे जोखमीचे आहेच, त्याचबरोबर मोकळ्या बाटल्या स्वच्छ धुतल्या पाहिजेत, अन्यथा त्यामध्ये बॅक्टरिया तयार होतो. दुसरा पर्याय ‘टेट्रा पॅक’ चा आहे, हे पॅकिंग सात स्तरांच्या आवरणाने बनलेले असते. यामध्ये १३५ डिग्री तापमानाचे दूध भरावे लागते. हे दूध सहा महिन्यांपर्यंत टिकाऊ असले तरी त्याची चव पिशवीतील दुधापेक्षा वेगळी लागते. त्याशिवाय पॅकिंग व प्रक्रियाखर्च वाढतो, पिशवीतील दुधापेक्षा किमान १३ रुपये ग्राहकांना जादा द्यावे लागणार आहे.प्रतिलिटर ६५ रुपये मोजावे लागणार असल्याने दूध सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. दूध संघांना कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करावी लागणारच, त्याशिवाय ग्राहकांच्या माथीही जादा बोजा बसणार असल्याने दोन्ही घटक अस्वस्थ आहेत.मशिनरीची किंमत आवाक्याबाहेरटेट्रा पॅक मशिनरी स्वीडनमधील कंपनी असून त्याची किंमत १५ कोटी आहे. महाराष्टÑातील ‘महानंदा’, ‘वारणा’, ‘प्रभात’, ‘पराग’, ‘डायनॅमिक’ या दूध संघाकडेच ही मशिनरी आहे. या मशिनरीची किंमत दूध संघांच्या आवाक्याबाहेर आहे.मोकळ्या पिशव्यांच्या संकलनासाठी ‘डेपो’दुधाच्या मोकळ्या पिशव्या संघांनी संकलित कराव्यात, असा आग्रह सरकारचा आहे; पण दोन-तीन दिवस पिशवी तशीच पडून राहिली तर खराब होऊन वास येतो. त्याऐवजी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींना दूध संघांनी प्रतिपिशवी ५० पैसे देऊन त्यांच्या माध्यमातून संकलित करायचे.प्रत्येक ठिकाणी डेपो काढले तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्नही वाढेल आणि हा पेचही सुटू शकेल, असे या व्यवसायातील तज्ज्ञांचे मत आहे.