शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरुंच्या कारभाराविरोधात ‘सुटा’चे जनजागरण धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:24 IST

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) ‘कुलगुरू हटाव’ आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून सुटातर्फे शुक्रवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच यावेळेत दसरा चौकात ‘जनजागरण धरणे आंदोलन’करण्यात आले.

ठळक मुद्देकुलगुरुंच्या कारभाराविरोधात ‘सुटा’चे जनजागरण धरणेआंदोलनाचा दुसरा टप्पा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) ‘कुलगुरू हटाव’ आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून सुटातर्फे शुक्रवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच यावेळेत दसरा चौकात ‘जनजागरण धरणे आंदोलन’करण्यात आले.आंदोलनस्थळी सुटाचे पदाधिकारी आणि सदस्य प्राध्यापकांनी ‘मनमानी व बेकायदेशीर कारभार करणाऱ्या  कुलगुरुंना हटविले पाहिजे’, ‘विद्यार्थी हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या कुलगुरुंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. त्यानंतर झालेल्या सभेत सुटाचे प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील, सहकार्यवाह सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची माहिती त्यांनी दिली.या आंदोलनात सुटाचे प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. डी. एन. पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, आर. के. चव्हाण, खजिनदार इला जोगी, ज्येष्ठ सल्लागार प्रा. सुधाकर मानकर, टी. व्ही. स्वामी, सयाजी पाटील, राज्य कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक, प्राथमिक शिक्षक समितीचे संजय पाटील, विद्यापीठ बचाव कृती समितीचे सदस्य, सुटाचे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील सदस्य प्राध्यापक सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने कुलपती आणि उच्च शिक्षण मंत्री यांना पाठविण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर