शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मंडळांची ढोल-ताशाला पसंती : डॉल्बीला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:42 IST

कोल्हापूर : यंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी ढोल-ताशांचा कडकडाटासह पारंपरिक वाद्यांना अधिक पसंती दिली. ‘

ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत श्रींच्या मिरवणुकाकार्यकर्त्यांनी पावसाची तमा न बाळगता ढोलताशांच्या ठेक्यावर नृत्याचा फेर धरला; अगदी २५०० पासून १५००० रुपये एका मिरवकीचाणु दर या ढोल-ताशा पथकांना मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : यंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी ढोल-ताशांचा कडकडाटासह पारंपरिक वाद्यांना अधिक पसंती दिली. ‘मोरया मोरया,’ ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयजयकार करीत शहरात बहुतांश सार्वजनिक तरुण मंडळांनी पावसामुळे रात्री उशिरा गणरायाचे स्वागत केले. बहुतांश मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरातच स्वागत मिरवणूक काढणे पसंत केले. काही मंडळांच्या गणेशमूर्ती लवकर तयार न झाल्याने उशिरापर्यंत ‘श्रीं’चे आगमन सुरू होते.

आकर्षक फुलांनी सजविलेली ट्रॅक्टर-ट्रॉली, वाहने घेऊन गणरायाला आणण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुपारी चारनंतर बाहेर पडले. पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, उचगाव या ठिकाणी मंडळांनी गर्दी केली होती. अनेक मंडळांनी आगाऊ नियोजन करून गणेशमूर्ती पावसात भिजू नये म्हणून मूर्तींच्या आकाराच्या प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्या होत्या. ढोल-ताशा पथक, छोट्या साउंड सिस्टीम, झांजपथक , लेझीम पथक, बेंजो पथक या पारंपरिक वाद्याच्या गजरावर पावसातही कार्यकर्त्यांनी नृत्याचा फेर धरला होता.

काही कार्यकर्ते हातात मंडळाचे ध्वज आणि कपाळावर ‘गणपती बाप्पा मोरया...’च्या पट्ट्या व टोप्या घालून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ परिसरातील तरुण मंडळांनी गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी मार्गावरून स्वागत मिरवणूक काढली. बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, सुभाष रोड, आदी मार्गांवरून मंडळांची अधिक वर्दळ होती. शुक्रवारी शाहूपुरी येथील राधाकृष्ण तरुण मंडळ, संभाजीनगर येथील आयडियल स्पोर्टस, तर मंगळवार पेठेतील जासूद गल्ली मित्रमंडळ, दत्ता काशीद मित्रमंडळ, बजापराव माने तालीम मंडळ,

कलकल मित्र मंडळ, चाणाक्य तरुण मंडळ, प्रतापसिंह तरुण मंडळ, हिंदवी स्पोर्टस, हिंद तरुण मंडळ, सुबराव गवळी तालीम मंंडळ, धर्मराज तरुण मंडळ, गुडलक तरुण मंडळ, तुकाराम माळी तालीम मंडळ, सरदार तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, महादेव तरुण मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, महाकाली तालीम मंडळ (शिवाजी पेठ), युवा गु्रप, मदनलाल धिंग्रा तरुण मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, सोल्जर गु्रप, बालगोपाल तालीम मंडळ, जय शिवराय मित्र मंडळ, कलकल गु्रप यांचा समावेश होता. ही आगमनाची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.पोलिसांच्या हाकेला मंडळांची सादयंदा डॉल्बीच्या दोन बेस दोन टॉपपेक्षा पारंपरिक वाद्यांना मंडळांनी अधिक पसंती दिल्याने शहरासह जिल्ह्यातून आलेल्या ढोल-ताशा पथकांना सुगीचा दिवस होता. त्यामुळे अगदी २५०० पासून १५००० रुपये एका मिरवकीचाणु दर या ढोल-ताशा पथकांना मिळाला. त्यात बेंजोपथक, बँडपथक यांनाही चांगले काम मिळाले. त्यामुळे पापाची तिकटी, बापट कॅम्प, शाहूपुरी, आदी परिसरात ढोल-ताशासह झांजपथकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसत होते.शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेक मंडळांनी आपल्या गणेशमूर्तीचे पावसापासून संरक्षण व्हावे याकरिता मूर्तीच्या त्या-त्या आकाराप्रमाणे प्लास्टिकच्या पिशव्यांची सोय केली होती. याकरिता विशेषत: अगदी पाच फुटांपासून २५ फुटांपर्यंतच्या प्लास्टिकच्या पिशव्या विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होत्या. यासह मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पावसाची तमा न बाळगता ढोलताशांच्या ठेक्यावर नृत्याचा फेर धरला; तर काही मंडळांनी मूर्तिकारांच्या दारातून थेट मंडळापर्यंत विनावाद्य ट्रॅक्टर-ट्रॉलीतून मूर्ती नेणे पसंत केले.