शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

शिरोळमध्ये पेयजल योजना वरदायी

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

३७ गावांना लाभ : नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर

संदीप बावचे - शिरोळ -प्रदूषणाबाबत भरपूर चर्चा केली जाते; मात्र आजवर ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. कृष्णेसह पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांना प्रदूषणाची लागण झाली आहे, अशा परिस्थितीत शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा शिरोळ तालुक्यातील ३७ गावांना झाला आहे. ५३ गावांपैकी ४९ गावांना सध्या नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. पेयजल योजना बहुतांशी गावांना वरदान ठरली आहे. शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर व कुरुंदवाड ही दोन नगरपालिका असलेली शहरे व ५३ खेडी आहेत. कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा व वारणा अशा चार नद्या लाभल्यामुळे सुजलाम्- सुफलाम् असा हा तालुका बनला आहे, असे असले तरी गटार गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीनंतर सर्वच नद्या प्रदूषित बनल्या आहेत. पंचगंगा नदीकाठावरील अकरा, तर कृष्णानदीकाठी असलेल्या २५ गावांना नदीचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध होते. तालुक्यातील अनेक गावांना शुद्धिकरणाशिवाय पाणीपुरवठा होत होता. गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात राज्य शासनाकडून अब्दुललाट, आलास, गणेशवाडी, औरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, शिवनाकवाडी, शिरदवाड, लाटवाडी, यड्राव, जांभळी, हरोली, आगर, नांदणी, दत्तवाड, कुटवाड, नृसिंहवाडी, हेरवाड, तेरवाड, कनवाड, अकिवाट, राजापूर, शिरोळ, टाकळीवाडी, शिरटी, उदगांव, चिंचवाड, अर्जुनवाड, घोसरवाड, टाकळी, तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर, संभाजीपूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, हसूर, आदी ३७ गावांत राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाल्यामुळे तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. यातील काही गावामध्ये योजना पूर्ण झाली असून, बहुतांशी योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. प्रदूषित पाण्याचा फटकाशिरोळ तालुक्याला चार नद्यांचे वरदान लाभले असले, तरी या नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. बेसुमार वाळू उपसा, तेलाचे तवंग, औद्योगिक वसाहतील सांडपाणी आणि राजापूर धरणातून बॅकवॉटरचे येणारे पंचगंगेचे मिसळलेले पाणी यामुळे बहुतांशी गावांना दूषित पाण्यावर अवलंबून राहावे लागते. याचाच फटका तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे.सर्वांना नदीचेच पाणीतालुक्यातील ५३ गावांपैकी ४९ गावांना सध्या नदीवरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कूपनलिका व विहिरीतील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर व संभाजीपूर या गावांतील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यालाच नदीचेच पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश कमळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली..चार गावे निविदेच्या प्रतीक्षेतशिरोळ तालुक्यातील तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर व संभाजीपूर या गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषद स्तरावरून या कामाच्या निविदा अद्याप निघालेल्या नाहीत. त्यामुळे या योजनेच्या कामास मुहूर्त केव्हा, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. ..