शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी विषय समित्या निवडीत नाट्यमय कलाटणी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:08 IST

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आज, शुक्रवारी होणाºया विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी सत्तारूढ व विरोधी आघाडीच्या स्वतंत्र बैठका झाल्या. आमदार सुरेश हाळवणकर येथे नसल्यामुळे सत्तारूढ आघाडीचा कोणताही निर्णय झाला नाही. दिल्लीहून हाळवणकर परत येताच त्यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी होणाºया बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. अशा पार्श्वभूमीवर विरोधी कॉँग्रेस व ...

इचलकरंजी : नगरपालिकेच्या आज, शुक्रवारी होणाºया विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी सत्तारूढ व विरोधी आघाडीच्या स्वतंत्र बैठका झाल्या. आमदार सुरेश हाळवणकर येथे नसल्यामुळे सत्तारूढ आघाडीचा कोणताही निर्णय झाला नाही. दिल्लीहून हाळवणकर परत येताच त्यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी होणाºया बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. अशा पार्श्वभूमीवर विरोधी कॉँग्रेस व शाहू आघाडीची ‘वेट अँड सी’ अशी भूमिका असली तरी त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

नगरपालिकेमध्ये भाजपाच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी निवडून आल्या असल्या तरी भाजपाला निर्णायक बहुमत मिळाले नाही. त्यामुळे भाजपा, ताराराणी आघाडी व राष्टÑवादी कॉँग्रेस अशी आघाडी सत्तेवर आली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे पाणीपुरवठा व बांधकाम या दोन समित्या देण्यात आल्या, तर ताराराणी आघाडीकडे उपनगराध्यक्षपद देऊन पुढील वर्षी (यंदा) पाणीपुरवठा व आरोग्य समिती देण्यात येईल, असा फॉर्म्युला ठरला होता.

मात्र, राष्टÑवादी कॉँग्रेसकडून पाणीपुरवठा व बांधकाम या दोन्ही समित्या आपल्याकडेच राहाव्यात, असा आग्रह कायम ठेवण्यात आला आहे.गुरुवारी सायंकाळी सत्तारूढ आघाडीचे मार्गदर्शक बादशहा बागवान यांच्या उपस्थितीत ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद सागर चाळके व राष्टÑवादी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद अशोकराव जांभळे यांची बैठक झाली. बैठकीमध्ये ताराराणी आघाडीला पाणीपुरवठा व आरोग्य समिती देण्याचे ठरले असल्याचे बागवान यांनी सांगितले. मात्र, जांभळे यांनी या दोन समित्या राष्टÑवादी कॉँग्रेसकडेच राहतील. त्याबाबत अंतिम निर्णय आमदार हाळवणकर घेतील, असे सांगून ते बैठकीतून उठून गेले.

अशा घडामोडी घडत असताना राष्टÑीय कॉँग्रेस व राजर्षी शाहू आघाडी या दोन्ही नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका झाल्या. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या सर्व २८ नगरसेवक-नगरसेविकांनी रात्री स्नेहभोजन घेतले. आज, शुक्रवारच्या समित्यांच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ आघाडीमध्ये होणाºया हालचालींवर लक्ष ठेवून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. परिणामी शुक्रवारी सकाळी नगराध्यक्षा स्वामी यांच्या घरी आमदार हाळवणकर व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये सत्तारूढ आघाडीच्या प्रमुखांच्या होणाºया बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसकडून पाणीपुरवठा व बांधकाम या दोन्ही समित्या आपल्याकडेच राहाव्यात, असा आग्रह कायमराष्टÑीय कॉँग्रेस व राजर्षी शाहू आघाडी या दोन्ही नगरसेवकांच्या स्वतंत्र बैठका