शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

ड्रेनेज लाईनवरील मोडकळीस आलेली झाकणे बनली मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 16:29 IST

कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानवरील मोठ्या ड्रेनेज लाईनवरील झाकणे मोडकीस आल्याने, ही ड्रेनेज लाईन म्हणजे साक्षात मुत्यूचा सापळाच बनला आहे.

ठळक मुद्देदुर्घटना घडल्यावरच प्रशासनास जाग येणार का? सामान्य नागरिकांतून विचारणाप्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील प्रवेशद्वारासमोर ड्रेनेज लाईन

कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानवरील मोठ्या ड्रेनेज लाईनवरील झाकणे मोडकीस आल्याने, ही ड्रेनेज लाईन म्हणजे साक्षात मुत्यूचा सापळाच बनला आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुध्दा कोणीच याकडे लक्ष देत नसल्याने, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनास जाग येणार का? असा प्रश्न सामान्य पालकांना पडला आहे.मंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील प्रवेशद्वारासमोरच मोठी ड्रेनेज लाईन गेली आहे. या ड्रेनेज लाईनवरील झाकणे मोडकळीस आली आहेत. समोरील केशवराव भोसले नाटयगृह, खासबाग मैदान, खाऊ गल्ली असल्याने या मैदानावर काही वेळेस नागरिक वाहनांचे पार्किंग करतात. या ठिकाणी सकाळ-सांयकाळ खेळण्यासाठी मुलांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते.या मोडकळीस आलेल्या ड्रेनिज लाईनच्या झाकणाबाबत शाळा प्रशासन आणि पालकांनी वारंवार महानगरपालिका, लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र त्यांची कोणीच दखल घेत नाही. या ड्रेनेज लाईनवरील झाकणे तत्काळ दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी येथील रहिवाशी आणि पालकांच्यामधून होत आहे.गंभीर घटनेनंतरच प्रशासन जागे होणार काय?मुंबईत प्रसिध्द डॉक्टर दिपक अमरापूरकर यांचा बळी याच कारणांमुळे गेला होता. पावसांच्या पाण्यात रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण काढल्याने ते त्यामध्ये पडून वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. तोच प्रकार येथेही घडून गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार काय, असा सवाल नागरिक, पालक करीत आहेत.

शाळा भरताना आणि सुटताना गप्पा मारण्याच्या नादात विद्यार्थी या उघड्या मॅनहोलजवळूनच ये-जा करतात. यावेळी चुकून याठिकाणचे एखादे झाकण उघडे राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ही झाकणे दुरुस्त करण्याची गरज आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.ड्रेनेज लाईवरील मोडकळीस आलेल्या झाकणाबाबत वारंवार लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र याची दखल अद्यापपर्यंत कोणीच घेतलेली नाही.प्रदीप व्हरांबळे,पालकप्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील मोठ्या ड्रेनेज लाईनवरील झाकणे मोडकीस आल्याने, ही ड्रेनेज लाईन म्हणजे साक्षात मुत्यूचा सापळाच बनला आहे.