शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

शिवाजी विद्यापीठाचे डॉ. पी. एस. पाटील ठरले जागतिक टॉप-१५० संशोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 12:22 IST

Shivaji University Education Sector Kolhapur : फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे जागतिक संशोधकांच्या यादीत टॉप-१५० मध्ये तर देशात दुसऱ्या स्थानी झळकले आहेत. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील त्यांचे संशोधनपर लेखन देशात सर्वाधिक वाचले गेले आहे. त्यांच्या संशोधनाला ३७०८ इतक्या व्ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा- २०१६-२०२१ मधून त्यांचे हे स्थान अधोरेखित झाले आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाचे डॉ. पी. एस. पाटील ठरले जागतिक टॉप-१५० संशोधक फोटोकॅटॅलिसीस, सौरघटवर संशोधन : देशात दुसरे स्थान

कोल्हापूर : फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे जागतिक संशोधकांच्या यादीत टॉप-१५० मध्ये तर देशात दुसऱ्या स्थानी झळकले आहेत. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील त्यांचे संशोधनपर लेखन देशात सर्वाधिक वाचले गेले आहे. त्यांच्या संशोधनाला ३७०८ इतक्या व्ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा- २०१६-२०२१ मधून त्यांचे हे स्थान अधोरेखित झाले आहे.डॉ. पी. एस. पाटील यांची मटेरिअल सायन्स, नॅनोसायन्स, फोटोकॅटॅलिसिस, सोलर सेल डेव्हलपमेंट आदी क्षेत्रांतील संशोधनासाठी जगभरातील आघाडीच्या संशोधकांमध्ये गणना केली जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या दोन टक्के संशोधकांमध्येही त्यांचे नाव आघाडीवर होते.

वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्येही ते अग्रस्थानी होते. २०१६ ते २०२१ या कालावधीतील ह्यस्कोपसह्ण डाटाच्या आधारे केवळ फोटोकॅटॅलिसिस व सोलर सेल क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील आघाडीच्या ५०० संशोधकांचा समावेश असणारा एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा जाहीर करण्यात आला.

या यादीमध्ये डॉ. पी. एस. पाटील हे १४७व्या स्थानी आहेत. त्यांच्यावर १३१व्या स्थानी ओडिशा येथील आय.टी.ई.आर. शिक्षा ओ अनुसंधान या संस्थेचे डॉ. के.एम. परिदा हे आहेत. भारतीय संशोधकांच्या यादीत डॉ. पारिदा हे प्रथम स्थानी तर डॉ. पाटील हे द्वितिय स्थानी आहेत. 

संशोधन क्षेत्रात सातत्याने आघाडीगेल्या अनेक वर्षांत शिवाजी विद्यापीठ हे फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट या क्षेत्रांमध्ये भरीव संशोधन करीत आहे. या संशोधन क्षेत्रात सातत्याने आघाडी टिकवून आहे. या पुढील काळातही व्यक्तीगत स्तरावर तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही संशोधन परंपरा अखंडित पुढे चालवित राहणे महत्त्वाचे आहे.डॉ. पी. एस. पाटील, प्र-कुलगुरू

 

विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब डॉ. पी. एस. पाटील यांची संशोधन क्षेत्रातील कामगिरी अभिनंदनीय आहे. त्यांच्या बरोबरीने विद्यापीठाच्या अन्य सात संशोधकांनीही देशातल्या आघाडीच्या ५०० संशोधकांत स्थान मिळविले, यातूनही विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा सिद्ध होतो.-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू.

काय आहे एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा ?'एल्सव्हिअर-सायव्हॅल ही वेब-बेस्ड संशोधन विश्लेषण प्रणाली असून २३० देशांतील सुमारे २० हजार शैक्षणिक व संशोधन संस्था आणि तेथे कार्यरत असणारे संशोधक यांचा लेखाजोखा या प्रणालीद्वारे मांडला जातो. संशोधन प्रवास, प्रवाह, नवसंशोधनाची सांगड अशा अभिनव पद्धतीने विश्लेषण करुन संशोधकांना पुरविले जाते. जगातल्या पाच हजारांहून अधिक प्रकाशनांच्या २२ हजारांहून अधिक संशोधन पत्रिकांचे विश्लेषण केले जाते. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठscienceविज्ञानEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर