लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी शनिवारी पार पडला. स्कूलच्या यू-ट्यूब चॅनलवरून झालेल्या या कार्यक्रमात ७०० पेक्षा जास्त विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी हर्षवर्धन पाटील, विद्यार्थिनी प्रतिनिधी सेजल गवळी, शिक्षणमंत्री क्षितिज जाधव यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना लोकशाही, निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया याची माहिती व्हावी व त्याचे महत्त्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या मतातून मंत्रिमंडळाची निवड केली जाते. यावर्षी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी आपला हक्क बजावला.
शालेय मंत्रिमंडळ पुढीलप्रमाणे : विद्यार्थी प्रतिनिधी हर्षवर्धन पाटील, विद्यार्थिनी प्रतिनिधी सेजल गवळी, शिक्षण मंत्री क्षितिज जाधव, क्रीडा मंत्री अर्जुन गोनूगडे, आरोग्यमंत्री श्रुती माने, संपादकीय मंत्री सुयश ओमर (सर्व १० वी ),
सांस्कृतिक मंत्री सृष्टी फरांदे ( ८ वी ), यावेळी अग्नी, पृथ्वी, आकाश व त्रिशूल हाऊसच्या कर्णधार, उपकर्णधार, वर्ग सेक्रेटरीचाही शपथविधी झाला. यावेळी ग्राम ऊर्जा फौंडेशनचे कार्यकारी अधिकारी दादासाहेब गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, स्कूलच्या अध्यक्षा विद्या पोळ उपस्थित होत्या.
प्राचार्य डॉ. सरदार जाधव यांनी मंत्रिमंडळाच्या शपथेचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार क्षितिज जाधव यांनी केले. प्रास्ताविक अश्विनी पाटील यांनी केले.
0000
फोटो कॅप्शन
पेठवडगाव येथील डॉ. सायरस पूनावाला स्कूलच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सहभागी विद्यार्थी.