शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
4
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
5
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
6
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
7
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
8
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
9
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
10
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
11
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
12
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
13
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
14
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
15
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
16
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
17
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
18
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
19
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
20
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवराज स्कूलला दुहेरी विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:21 IST

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन व टॅलेंट कौन्सिल ग्लोबल (टीसीजी ) फौंडशनतर्फे आयोजित युनायटेड बेबी लीग फुटबॉल ...

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन व टॅलेंट कौन्सिल ग्लोबल (टीसीजी ) फौंडशनतर्फे आयोजित युनायटेड बेबी लीग फुटबॉल स्पर्धेत शिवराज स्कूलने १० व १२ वर्षे वयोगटात दुहेरी विजेतेपद पटकाविले. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे हे १३ वे वर्ष होते.

साधना विद्यालय व गडहिंग्लज हायस्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. न्यू होरायझनच्या साई बनगे व शिवराजच्या अथर्व बंग्यानावर यांनी स्पर्धावीरचा बहुमान पटकाविला.

१२ वर्षे गटात एकूण २१ साखळी सामने झाले. शिवराज स्कूलने चार सामने जिंकून, तर एक बरोबरीत सोडवून १३ गुणांसह अजिंक्यपद पटकाविले. गडहिंग्लज हायस्कूल व न्यू होरायझन स्कूल यांनी प्रत्येकी ३ सामने जिंकले, तर एक बरोबरीत राखत समान दहा गुण मिळविले. गोलसरासरीवर गडहिंग्लज हायस्कूलने बाजी मारून उपविजेतेपद मिळवले, तर साधना हायस्कूल संघाला ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहावे लागले.

दहा वर्षांखालील गटात १० सामने झाले. यातही शिवराज स्कूल तीन सामने जिंकून व एक सामना बरोबरीत ठेवत सर्वाधिक १० गुणांसह विजेता ठरला. साधना विद्यालयाने ७ गुणांसह उपविजेतेपद, तर सर्वोदया स्कूलने ६ गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला.

दयानंद चौगुले, प्रमोद इंचनाळकर, संजय पाटील यांच्याहस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना क्रीडासाहित्य व चषक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धा समन्वयक ओंकार घुगरी, ओंकार सुतार यांचा सत्कार केला. यावेळी सुनील चौगुले, संभाजी शिवारे, प्रसाद गवळी, सूरज तेली, ओंकार जाधव, यासीन नदाफ यांच्यासह खेळाडू, क्रीडाशिक्षक आणि पालक उपस्थित होते.

भूपेंद्र कोळी यांनी स्वागत केले. दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविक केले. हुल्लाप्पा सूर्यवंशी यांनी आभार मानले.

--------------------------

* स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट...

गोलरक्षक - आयन मुल्ला, आदित्य पाटील, बचावपटू - अनमोल तरवाळ, तेजस सावरतकर, मध्यरक्षक- अजिंक्य हातरोटे, ज्ञानेश्वर कावडे, आघाडीपटू- दर्शन तरवाळ, विनायक गोंधळी.

--------------------------

* फोटो ओळी :

गडहिंग्लज येथे आयोजित टीसीजी बेबी लीग फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या शिवराज स्कूलला दयानंद चौगुले यांच्याहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुनील चौगुले, प्रमोद इंचनाळकर, संजय पाटील आदी उपस्थित होते. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : ०५०४२०२१-गड-०३