शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ‘दिलबहार’चा डबल धमाका ; खंडोबा, उत्तरेश्वर पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 13:25 IST

के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर दिलबहार ‘ब’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळचा २-० असा पराभव करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

ठळक मुद्देके. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर दिलबहार ‘ब’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळचा २-० असा पराभव करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली.शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी दिलबहार ‘अ’ व ‘खंडोबा ‘अ’ यांच्यात सामना झाला.

सामन्यांच्या प्रारभापासून दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलक्षेत्रात धडक मारत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दिलबहार ‘अ’कडून इमॅन्युअल, जावेद जमादार, सूरज शिंगटे, अकिल पाटील, अमोस अडिसा यांनी खोलवर चढाया केल्या; तर ‘खंडोबा’कडून कपिल शिंदे, अ‍ॅँड्र्यू बुरटाल, रणवीर जाधव, ऋतुराज संकपाळ, श्रीधर परब यांनीही तितक्याच तोडीस तोड खेळ करीत प्रतिआक्रमण केले. मात्र, दोन्ही संघांना पूर्वार्धात गोल करता आला नाही.

उत्तरार्धात ६८ व्या मिनिटाला सेंटरपासून दिलबहार ‘अ’च्या अनिकेत तोरस्करने गोलरक्षक रणवीर खालकर पुढे आल्याची संधी साधत चेंडू अलगदपणे त्याच्या डोक्यावरून मारला आणि हा पहिला गोल नोंदविण्यात दिलबहार ‘अ’ला यश आले. या गोलनंतर ७२ व्या मिनिटाला ‘दिलबहार’कडून सनी सणगरने दुसरा गोल करीत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. हीच आघाडी दिलबहार ‘अ ’ संघाच्या विजयास कारणीभूत ठरली.

दिलबहार ‘ब’ व उत्तरेश्वर वाघाची तालीम यांच्यात झालेल्या सामन्यात दिलबहार ‘ब’नेही २-० अशा गोलफरकाने विजय मिळविला. ३८ व्या मिनिटाला दिलबहार (ब)कडून शुभम माळीने गोल करीत संघास १-० आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ५१ व्या मिनिटाला पुन्हा दिलबहार ‘ब’कडून रोहन दाभोळकरने गोल करीत ही आघाडी २-० अशी भक्कम केली. ‘उत्तरेश्वर’कडून सॅबेस्टिनी, स्वप्निल पाटील, स्वराज्य पाटील यांनी आघाडी कमी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. दिलबहार ‘ब’कडून स्वप्निल भोसले, सतेज साळोखे, आकाश पोरे यांनी उत्कृष्ट चाली रचल्या. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्याने दिलबहार ‘ब’नेही विजयी सलामी दिली.आजचे सामनेदुपारी २ वाजता : संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलीसदुपारी ४ वाजता : पाटाकडील (अ) विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर