शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंनी सरकारला जयप्रभा स्टुडिओप्रश्नी लक्ष घालण्याची केली विनंती, म्हणाले...

By संदीप आडनाईक | Updated: October 21, 2022 17:21 IST

जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे

कोल्हापूर : कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी गेले अडीचशे दिवस आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी उग्र रूप धारण करुन आज, शुक्रवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करीत सरकारला या विषयात लक्ष घालण्याची विनंती करत जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्यांना पाठीशी घालू नये, अशी मागणी करत जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, असे आवाहन केले आहे.छत्रपती संभाजीराजे यांनी आज, त्यांच्या ट्विटर खात्यावरुन हे आवाहन केले. या ट्विटमध्ये ते म्हणाले, भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोल्हापुरात रोवली गेली. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रपट सृष्टीस उत्तेजन देण्यासाठी कोल्हापूर येथे स्टुडिओ सुरू केला. सध्या जयप्रभा स्टुडिओ या नावाने ओळखला जाणारा हा स्टुडिओ नंतरच्या काळात महाराजांनी हा स्टुडिओ केवळ चित्रपट निर्मितीसाठीच वापरायचा या अटीवर सुप्रसिध्द चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांच्याकडे सोपविला.बहुतांश नामांकित मराठी चित्रपटांचे शूटिंग हे याच स्टुडिओमध्ये झालेले आहे. कित्येक हिंदी चित्रपट देखील याठिकाणी घडले. नंतर काही कारणांनी पेंढारकर यांनी देखील या स्टुडिओवरील ताबा गमविला. कोल्हापूरच्या कलानगरीचा कणा असणारा हा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ अलिकडच्या काळात विकसकाच्या घशात घातला जात आहे. यामुळे या स्टुडिओचे अस्तित्व संपत चालले आहे.कोल्हापूरात गेले २५० दिवस कलाक्षेत्राशी निगडीत जनतेचे हे आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे. जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती