शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल यांच्या झोळीत कोल्हापुरातील कष्टकऱ्यांचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 11:32 IST

दिल्लीत विधानसभेची सध्या निवडणूक सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ पक्ष तिस-यांदा रिंगणात उतरला आहे. केजरीवाल यांनी आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, पाणी, वीज या क्षेत्रांत लोकाभिमुख कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशभर कौतुकास्पद आहे. त्याचे अनुकरण येथील सरकारांनीही करावे, याच उद्देशाने ‘सर्व श्रमिक संघ’ या डाव्या संघटनांनी केजरीवाल यांच्यासाठी निवडणूक निधी उभारण्याचे आवाहन केले होते.

कोल्हापूर : दिल्लीतील केजरीवाल सरकार आणि कोल्हापुरातील कष्टकरी समाज यांचे म्हटले तर कोणतेही नाते नाही; पण केजरीवाल यांनी सर्वसामान्यांसाठी सुरू केलेला राज्यकारभार पाहून भारावलेल्या कोल्हापुरातील कष्टकऱ्यांनी एक-दोन नव्हे, तर चक्क ५० हजार रुपये जमवून निवडणूक निधी म्हणून ‘आप’कडे सुपूर्द केला. या अनोख्या दातृत्वाने ‘आप’चे कार्यकर्तेही भारावून गेले. त्यांनी ‘कष्टकºयांनी घामाच्या पैशांतून दिलेले हे दान वाया जाणार नाही. केजरीवाल विजयी होतीलच आणि कोल्हापूरचे दातृत्वही लक्षात ठेवतील,’ असा आशावाद व्यक्त केला.

दिल्लीत विधानसभेची सध्या निवडणूक सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ पक्ष तिस-यांदा रिंगणात उतरला आहे. केजरीवाल यांनी आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, पाणी, वीज या क्षेत्रांत लोकाभिमुख कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशभर कौतुकास्पद आहे. त्याचे अनुकरण येथील सरकारांनीही करावे, याच उद्देशाने ‘सर्व श्रमिक संघ’ या डाव्या संघटनांनी केजरीवाल यांच्यासाठी निवडणूक निधी उभारण्याचे आवाहन केले होते. यास अनुसरून लाल निशाण पक्ष, बँक एम्प्लॉईज, शेतमजूर संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, मेकॅनिकल युनियन, पेन्शन संघटना, आदींनी एकत्र येत आपल्या घामातून मिळविलेल्या दामापैकी काही रक्कम निवडणूक निधी म्हणून संकलित केली. ती ५० हजार इतकी झाली.

शनिवारी लक्ष्मीपुरीतील सर्व श्रमिक संघाच्या संतराम पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा निधी सुपूर्द केला गेला. आप पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय देसाई यांच्याकडे अतुल दिघे, प्रकाश जाधव, सुवर्णा तळेकर, सुधाकर सावंत, आनंद कुलकर्णी, एस. टी. पाटील, प्रकाश कांबळे यांच्या हस्ते कष्टकºयांच्या उपस्थितीत तो देण्यात आला. 

केंद्र व राज्य सरकारांकडून कष्टक-यांंची आबाळच होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे हित पाहणारे केजरीवाल सरकार हे आशादायी चित्र आहे. त्यांना पाठबळ म्हणून हा उपक्रम राबविला. त्याला कष्टकºयांनी दिलेला प्रतिसाद उत्साह वाढविणारा आहे.- अतुल दिघे, सर्व श्रमिक संघकोल्हापूरकरांना दिल्लीशी थेट संबंध नसतानाही चांगल्याला चांगले म्हणण्याची कोल्हापूरकरांच्या प्रवृत्तीचेच दर्शन यातून घडले आहे. पक्षांना मोठ्या देणग्या मिळतात; पण दुसºया पक्षाला आणि स्वत:कडे थोडेच असतानाही निधी जमविणे हे खूपच कौतुकास्पद आहे.- संजय देसाई, आप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAAPआप