शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

घरेलू कामगारांची निदर्शने

By admin | Updated: October 6, 2016 01:14 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : ‘महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियन’तर्फे आंदोलन

कोल्हापूर : घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे घरेलू कामगारांसाठी पेन्शन योजना राबवावी, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी महाराष्ट्र राज्य घर कामगार युनियनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.दुपारी सर्व घर कामगार महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटल्या. या ठिकाणी घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यानंतर शिष्टमंडळाने जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले.घरेलू कामगारांची वाढती संख्या व त्यांच्या संघर्षाचा परिणाम म्हणून २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने घर कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. आज या कल्याणकारी मंडळात किमान सव्वा दोन लाख घर कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे; परंतु घर कामगारांची नोंदणीची संख्या पाहता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या योजना फारच कमी व बंदिस्त स्वरुपाच्या आहेत. कल्याणकारी मंडळ हे एक सदस्यीय मंडळ बनल्यानंतर कोणत्याही नवीन योजना अथवा लाभ घरेलू कामगारांना मिळालेला नाही. कल्याणकारी मंडळाचा ढाचा व केवळ घरेलू कामगारांसाठी योजना राबविण्यापर्यंत मर्यादित ठेवला आहे. त्यामुळे घरेलू कामगारांच्या कामगार हक्कांसाठी घर कामगारांचा लढा अजूनही चालू आहे.पुन्हा एकदा घरेलू कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. वृद्ध घरेलू कामगार महिलांना त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर (तमिळनाडू सरकारच्या योजनेप्रमाणे) कल्याण मंडळातर्फे पेन्शन योजना जाहीर करावी. घरेलू कामगारांना किमान वेतन व कायद्याने संरक्षण द्यावे, अन्नसुरक्षा कायदा २०१३ च्या अंतर्गत घरकामगारांची अन्नसुरक्षा सुरक्षित करावी. राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना लागू करून प्रत्येक घरेलू कामगार महिलांच्या कुटुंबीयांना त्याचा लाभ द्यावा. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाची पुनर्रचना माथाडी मंडळाच्या धर्तीवर करावी, अशा मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.आंदोलनात जिल्हा समन्वयक अनुप्रिया कदम, लक्ष्मी कांबळे, अनिषा पाटील यांच्यासह महिलांचा समावेश होता.