शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

‘खंडोबा’ची डॉल्बीविरहित मिरवणूक- दोन हजार महिलांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 20:24 IST

कोल्हापूर : डॉल्बीच्या दुष्परिणामाबाबत सुरूअसलेल्या जनजागृतीचा आपणही एक भाग बनावे म्हणून यंदाच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित काढण्याचा निर्णय शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाने घेतला आहे. मंगळवारी निघणाºया मिरवणुकीत परिसरातील सुमारे दोन हजार महिला एकसारख्या रंगाच्या साड्या परिधान करून सहभागी होणार आहेत. ही माहिती मंडळाचे अध्यक्ष विक्रम जरग यांनी शनिवारी पत्रकार ...

ठळक मुद्देविक्रम जरग यांची माहितीआठ दिवसांपासून कार्यकर्त्यांचे मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न ज्येष्ठांकडून सुरूहोते.महिलांच्या सहभागामुळे मिरवणुकीत शिस्त व पावित्र्य जपले जाईल,डॉल्बी लावायचाच असा निर्धार करून ती २ लाख ६० हजार रुपयांना ठरविली.

कोल्हापूर : डॉल्बीच्या दुष्परिणामाबाबत सुरूअसलेल्या जनजागृतीचा आपणही एक भाग बनावे म्हणून यंदाच्या गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक डॉल्बीविरहित काढण्याचा निर्णय शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाने घेतला आहे. मंगळवारी निघणाºया मिरवणुकीत परिसरातील सुमारे दोन हजार महिला एकसारख्या रंगाच्या साड्या परिधान करून सहभागी होणार आहेत. ही माहिती मंडळाचे अध्यक्ष विक्रम जरग यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितली.

खंडोबा तालीम मंडळाने २०१३ पासून साध्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढली आहे. यंदा मंडळाची नवीन इमारत बांधल्यामुळे मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावायचाच असा निर्धार करून ती २ लाख ६० हजार रुपयांना ठरविली. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉल्बीमुक्तीचे अभियान राबविण्यास सुरुवात केली, तर डॉल्बीमुळे होणारे परिणाम आणि बदललेले कायदे याबाबत पोलीस खात्याकडून जनजागृती सुरूकेली. स्वत: पालकमंत्री पाटील यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन डॉल्बी न लावण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून यंदाची मिरवणूक डॉल्बीविरहित काढण्याच्या निर्णय घेण्यात आला, असे जरग यांनी सांगितले.

गेल्या आठ दिवसांपासून कार्यकर्त्यांचे मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न ज्येष्ठांकडून सुरूहोते. अखेर त्याला यश येऊन कार्यकर्ते तयार झाले. तरुणांचे करिअर बिघडायला नको अशी आमचीही यामागे भावना होती. डॉल्बीसाठी देणाºया रकमेत आणखी थोडी रक्कम घालून परिसरातील दोन हजार महिलांना साड्या देऊन मिरवणुकीत सहभागी करून घेण्याचे मंडळाने ठरविले आहे. एकसारख्या रंगाच्या साड्या परिधान करून महिला मिरवणुकीत अग्रभागी असतील, तसेच गणपती विसर्जन झाल्यावरच त्या घरी जाणार आहेत. महिलांच्या सहभागामुळे मिरवणुकीत शिस्त व पावित्र्य जपले जाईल, असे जरग म्हणाले.

मिरवणुकीत महालक्ष्मी प्रतिष्ठाणचे ढोल, ताशा पथक असणार असून, या पथकात १२० कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय आनंदराव ठोंबरे व पंडितराव पोवार यांची मर्दानी खेळाची पथके असतील. शिवाय पन्नास मुलींचे एक लेझीम पथकही असेल. मिरवणुकीत महिलांना पिण्यासाठी पाच हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले जाणार आहे.पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष सुरेश पोवार, सेके्रटरी राजेंद्र चव्हाण, खजानीस अरुण पोवार, कोंडराम साळोखे, सचिन पोवार, मनोज बालिंगकर, मधू तावडे, भरत जाधव, बबन मोरे, शेखर साळोखे, संदीप डकरे, ओंकार जोशी उपस्थित होते.डॉल्बीचा आग्रह धुडकावलाखंडोबा तालीम काय करणार हा गेल्या काही दिवसापासून शहरात चर्चेचा विषय ठरला होता. अनेकांनी आम्हाला सांगितले की तुम्ही माघार घेऊ नका. डॉल्बीचा आग्रह कायम ठेवा. काहींनी तर आम्हाला पैसेही देऊ केले होते. आमच्या निर्णयावर अन्य मंडळांचे निर्णय ठरणार होते. मात्र, आम्ही डॉल्बी लावणार नाही याबाबत ठाम राहिलो, असे विक्रम जरग यांनी सांगितले.