शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बीमुक्त गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे.त्यासाठी येथून पुढे कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये डॉल्बी लावल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन-चार वर्षांतील सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा’ची परंपरा कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत राबविण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाने केला आहे.त्यासाठी येथून पुढे कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये डॉल्बी लावल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.डॉल्बीचे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे कोणत्याही समारंभात डॉल्बी लावण्यास परवानगी नाकारली जाणार आहे. निवडणुका असो किंवा राजकीय व्यक्तींचा दहीहंडीचा कार्यक्रम असो, डॉल्बी लावण्यास सक्त मनाई केली जाणार आहे.आगामी गणेशोत्सवात डॉल्बीचावापर करू नये, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या जिल्ह्यांतील सर्व सार्वजनिक तरुण मंडळांच्या अध्यक्षांना नोटिसा पाठवून जनजागृती केली जाणार आहे. तसेच डॉल्बीसंबंधी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व सार्वजनिक तरुण मंडळांची विशेष बैठक बोलाविण्याचे आदेशही पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, असे विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.तरुणांनी डॉल्बीपासून लांब रहावे१ गतवर्षी नियमबाह्य डॉल्बी लावणारी सार्वजनिक मंडळे, तालीम संस्था यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.२ या कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर राहावे लागत आहे. मंडळातील बहुतांशी कार्यकर्ते हे तरुण आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे शैक्षणिक करिअर संपुष्टात येते. त्यामुळे त्यांची व कुटुंबाची मोठी हानी होते.३ या गोष्टीचा विचार करून तरुणांनी डॉल्बीपासून लांब राहून गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.