शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुत्रे चावलेल्या रुग्णास पोलिसांकडून मारहाण

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

जुना राजवाडा पोलिसांचे कृत्य : नागरिकांतून तीव्र संताप

कोल्हापूर : भवानी मंडप परिसरात हाताला कुत्र्याने चावा घेतल्याने भीतीने पोलीस ठाण्यात पळत आलेल्या रुग्णालाच पोलिसांनी बेदम मारहाण करून हाकलून लावले. काशीम खाजासाब शेख (वय ३३) असे त्याचे नाव आहे. जखमी रुग्णाला मदत करण्याऐवजी त्यालाच मारहाण करणाऱ्या पोलिसांबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. जखमी शेख याच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, काशीम शेख हा हातगाडीवर केळीविक्रीचा व्यवसाय करतो. तो भवानी मंडप ते शिवाजी चौक परिसरात केळी विक्रीसाठी फिरत असतो. आज, गुरुवारी दुपारी अकराच्या सुमारास तो भवानी मंडप परिसरात फिरत असताना कुत्र्याने त्याचा पाठलाग केला. कुत्र्याने त्याच्या हाताचा चावा घेतल्याने तो भीतीने पळत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गेला.याठिकाणी तो वेदनेने रडू लागला. त्यावर पोलिसांनी त्याची विचारपूस न करता त्याला उलट मारहाण करून तेथून हाकलून लावले. हातातून रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत तो ‘सीपीआर’मध्ये आला. याठिकाणी त्याने डॉक्टरांना आपल्याला कुत्रे चावले असून, जुना राजवाडा पोलिसांनी आपल्याला विनाकारण मारहाण केल्याचे सांगितले. या ठिकाणीही तो वेदनेने मोठमोठ्याने रडू लागला. अंगातील टी-शर्ट वर करून पोलिसांनी मारहाण केल्याचे दाखवू लागला. अखेर डॉक्टरांनी त्याची समजूत काढत उपचार करून घरी पाठवून दिले. संकटकाळी मदत करणारे पोलीसच वैरी बनल्याने ‘सीपीआर’मध्ये डॉक्टरांसह इतर रुग्ण व नातेवाईक ‘रुग्णाला कुत्रं चावले ते चावलं; पोलिसांनापण आता कुत्रं चावलंय की काय?’ अशी चर्चा करीत होते. जबाबदारी झटकण्यासाठी रुग्णाला मारहाण करणाऱ्या पोलिसांना वरिष्ठ अधिकारी लगाम घालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)