शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सीपीआरच्या विकासासाठी डॉक्टरांनी सहभागी व्हावे

By admin | Updated: November 30, 2015 01:07 IST

जयप्रकाश रामानंद : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची परिषद

सीपीआरच्या विकासासाठी डॉक्टरांनी सहभागी व्हावे जयप्रकाश रामानंद : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची परिषदकोल्हापूर : सीपीआर ही राष्ट्रीय संपत्तीतून उभारलेली संस्था असून सर्वसामान्य रुग्णांचा आधार आहे. त्यामुळे सीपीआर जिवंत ठेवण्यासह त्याच्या विकासासाठी कोल्हापूरकरांनी लक्ष द्यावे तसेच त्यात शासकीय, खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनीदेखील सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन राजर्र्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे रविवारी आयोजित केएमए कॉन २०१५ या वार्षिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘औषधशास्त्रातील नवीन घडामोडी, त्याची उपयोगिता’ असा परिषदेचा विषय होता. प्रभारी अधिष्ठाता डॉ. रामानंद म्हणाले, कोल्हापुरातील वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआरचा आवश्यक त्या प्रमाणात विकास झालेला नाही, हे शासकीय मर्यादांचे एक उदाहरण आहे. सध्या शासकीय आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रात दरी दिसून येते. ही दरी मिटवून या दोन्ही क्षेत्रांनी काही बाबतीत एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. सामाजिक बांधीलकीतून सीपीआर, वैद्यकीय महाविद्यालयासाठी कार्यरत राहावे. या संस्थांच्या विकासासाठी मार्गदर्शन, सूचनांच्या माध्यमातून पाठबळ द्यावे.कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ‘केएमए फ्लॅश’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. डॉ. अल्पना चौगुले यांनी रेखाटलेले शिवराज्याभिषेकाचे चित्र असोसिएशनला भेट दिले. यावेळी सहसचिव आर. एम. कुलकर्णी, प्रकाश पाटील, प्रविण हेंद्रे, राजकुमार पाटील, रविंद्र शिंदे, हणमंत पाटील, जयंत वाटवे, आनंद कामत, अजित लोकरे, संदीप पाटील, गिरीश कोरे, जे. के. पाटील, विवेकानंद कुलकर्णी, राजेंद्र वायचळ, सुनील कुबेर, सोपान चौगुले आदी उपस्थित होते. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पी. एम. चौगुले यांनी स्वागत केले. किरण दोशी यांनी परिषदेच्या विषयाची माहिती दिली. अमर आडके यांनी सूत्रसंचालन केले. कोल्हापूर विभागीय केंद्रासाठी प्रयत्ननाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय आहे. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना शोधप्रबंध सादर करणे, कार्यालयीन काम आदी विविध अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी कोल्हापुरात विभागीय केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले.