शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या बंदचा खासगी रुग्णसेवेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:34 IST

कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी काम बंद आंदोलनास कोल्हापुरात मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून,

ठळक मुद्देहजारहून अधिक डॉक्टर सहभागी : बाह्यरुग्ण विभागावर परिणाम

कोल्हापूर : कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी काम बंद आंदोलनास कोल्हापुरात मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवून, संपात सहभाग घेतल्याने रुग्णसेवेला काही प्रमाणात फटका बसला. तथापि, अत्यावश्यक रुग्णसेवा सुरू होत्या.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनसह अनेक वैद्यकीय संघटनांच्या शिष्टमंडळांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदविला. तसेच या आंदोलनात ‘केएमए’च्या सुमारे एक हजारहून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदविला.‘आयएमए’च्या आदेशानुसार सोमवारी जिल्ह्णातील सकाळी सहा ते मंगळवारी सकाळी सहा असे २४ तास बाह्यरुग्ण विभागांसह वैद्यकीय सेवा बंद राहिल्या. या आंदोलनात कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे सर्व सभासद डॉक्टर सहभागी झाले होते. त्यांनी आपले दवाखान्याचे ‘ओपीडी’ विभाग बंद ठेवले होते. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोठ्या रुग्णालयात अत्यावश्यक रुग्णसेवा आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरू होत्या.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिजित देशमुख यांना निवेदन देऊन, असे प्रकार भविष्यात होऊ नये म्हणून डॉक्टरांना संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी असे प्रकार घडल्यास डॉक्टरांनी गप्प न बसता ‘झिरो टॉलरन्स’साठी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यास आम्ही कारवाई करू, अशी ग्वाही अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली. या शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप साळोखे, उपाध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के, सचिव डॉ. आशा जाधव, डॉ. पी. एम. चौगुले, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. संदीप पाटील, डॉ. शीतल देसाई, डॉ. किरण दोशी यांच्यासह १00हून अधिक डॉक्टरांचा सहभाग होता.यांनी दिला पाठिंबाकेमिस्ट असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशियल असोसिएशन (जीपीए), निहा, (होमीओपॅथिक असोसिएशन), मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.), डेन्टल असोसिएशन, सर्जन असोसिएशन (केएसएस), फिजिशियन असोसिएशन, कान-नाक-घसा सर्जन असो. या वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांनी ‘आयएमए’च्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी काम बंद आंदोलनास कोल्हापुरात प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर