शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, वाहनचालकांकडे कसून चौकशी

By admin | Updated: September 12, 2016 01:04 IST

नार्कोटिकबाबत विचारणा : परिस्थितीजन्य पुरावे ‘एसआयटी’च्या हाती

 कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासात पनवेल येथील ‘सनातन’च्या आश्रमातून नार्कोटिक औषधांबाबत चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरासह वाहनचालकांकडे ‘एसआयटी’चे पथक कसून चौकशी करीत आहे. डॉ. वीरेंद्र तावडे याच्या सांगण्यावरून आपण प्रत्येक आश्रमात व ज्याठिकाणी साधक मेळावे घेतले जातात त्याठिकाणी ही औषधे पुरविण्याचे काम करीत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. ही औषधे कोठून आणली, ती बनवितो कोण? याची सखोल माहिती घेतली जात असल्याचे वरिष्ठांनी सांगितले. पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील संशयित सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्र तावडे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या सात दिवसांच्या चौकशीमध्ये पानसरे हत्याप्रकरणाचा मास्टर मार्इंड तावडे असल्याचे परिस्थितीजन्य पुरावे ‘एसआयटी’च्या हाती आले आहेत. पनवेल येथील आश्रमावर पथकाने छापा टाकला असता तेथून नार्कोटिक औषधांचा साठा जप्त केला. ही औषधे आश्रमात येणाऱ्या साधकांना दिली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचा वापर आजारासाठी की अन्य कोणत्या कारणांसाठी केला जातो, याबाबत कसून चौकशी सुरू आहे. आश्रमातील एका डॉक्टरासह वाहनचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी डॉ. तावडे यांच्या सांगण्यावरून आम्ही इतर आश्रमांत ही औषधे पुरवित असल्याची कबुली दिली आहे. भूमिगत विनय पवार हा साधक बेपत्ता आहे. त्याच्या वास्तव्याची माहिती तावडेला आहे; परंतु तो त्याच्याविषयी माहिती देत नाही. रविवारी पोलिसांनी तावडेकडे कसून चौकशी केली. येत्या दोन दिवसांत यापूर्वी त्याचे वास्तव्य असलेल्या गंगावेश, शिवाजी पार्क, वारणानगर, कर्नाटक व गोवा राज्यांत तपासासाठी फिरविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. रात्री उशिरा त्याची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली. (प्रतिनिधी) तावडेला कोठडीत मोकळीकता राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत जीवितास धोका असल्याची तक्रार डॉ. तावडे याने वकिलांकडे केली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी या कोठडीतील इतर गुन्ह्णांतील आरोपींची रवानगी करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत केली आहे. राजारामपुरीच्या कोठडीत तावडेला पूर्ण मोकळीकता दिली आहे. तसेच त्याच्या सुरक्षेमध्येही वाढ केली आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तावडेची भेट घेतली. यावेळी त्याच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्याने पोलिसांविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. जिवाच्या भीतीने रक्तदाब वाढला राजारामपुरीच्या कोठडीतील अन्य गुन्ह्यांतील आरोपींकडून आपल्या जीवितास धोका असल्याची भीती तावडेला होती. त्याची शनिवारी (दि. १०) रात्री सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केली असता रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सुमारे दोन तास त्याला याठिकाणी ठेवण्यात आले. रक्तदाब सुरळीत झाल्यानंतर त्याला तेथून हलविले.