पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. कुंभार याचा लक्षतीर्थ वसाहतीमध्ये दवाखाना आहे. या दवाखान्यात आजारी असल्याने तपासणीसाठी आलेल्या एका विवाहित महिलेशी गुरुवारी (दि. ३) रात्री डॉ. कुंभार याने असभ्य वर्तन केले. या प्रकाराने घाबरलेल्या त्या विवाहित महिलेने नातेवाइकांसोबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. कुंभार याला अटक केली.
रुग्ण महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी डॉक्टरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST