शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

अवैध होर्डिंग्जकडे डोळेझाक का?

By admin | Updated: November 25, 2014 23:49 IST

महापालिकेवर राजकीय दबाव : म्हणे शहरात केवळ १५० अनधिकृत जाहिरात अन् होर्डिंग्ज; कारवाई कधी?

संतोष पाटील - कोल्हापूर -राजकीय वजनाखाली हबकलेली यंत्रणा अवैध होर्डिंग्ज काढण्याचे धाडस दाखवू शकत नसल्याने दोन महिन्यांत नागरिकांनी ६३ तक्रारी करूनही फक्त ३६ होर्डिंग्ज काढण्यातच प्रशासनाला यश आले. राजकीय आधारस्तंभावर उभी असलेली ही अवैध होर्डिंग्ज महापालिकेला वर्षाला ३० लाखांचा गंडा घालत आहेत.शहर विकास आराखड्यानुसार शहरातील प्रमुख रस्त्यांची लांबी १ लाख २९ हजार ९६४ मीटर असून, त्यांना जोडणारे ३२४ चौक आहेत. महापालिकेच्या नोंदीनुसार या सर्व मोक्याच्या ठिकाणी ५३१ अधिकृत होर्डिंग्ज आहेत तर संपूर्ण शहरात फक्त १५० अनधिकृत जाहिरात व होर्डिंग्ज असावेत, असा प्रशासनाचा अंदाज आहे. इस्टेट विभागातील नोंदीनुसार शहरात ५२१ होर्डिंग्ज्ची परवानगी घेतलेली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या होर्डिंग्जव्यतिरिक्त शहर व उपनगरांत वाढदिवस, शुभेच्छांसह विकासकामांचा दिंडोरा पिटण्यासाठी पाच हजारांहून अधिक होर्डिंग्ज व डिजीटल फलक लावल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. त्यातील ९९ टक्के पोस्टरबाजी ही राजकीय लोकांचीच आहे. न्यायालयाच्या दणक्यामुळे महापालिका आत ‘पोस्टरमुक्त शहर’ अभियान हाती घेणार आहे.महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा १९९५नुसार अवैध होर्डिंग्ज व जाहिराती लावणाऱ्यांना तीन महिने कैद तसेच दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानंतर अवैध जाहिरातीसाठी नागरिकांना तक्रार करण्यास सोपे जावे यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केला. या क्रमांकावर आजपर्यंत ६३ तक्रारी आल्या. राजकीय पाठबळ नसलेली ३६ होर्डिंग्ज हटविण्यात यंत्रणेला यश आले. शहरात अनधिकृत जाहिरातींचे जाळे पसरत असताना यंत्रणा मात्र डोळेझाकपणा करत आहे. महापालिकेने आजपर्यंत फौजदारी दाखल करण्याचे धाडस दाखविलेले नाही. फौजदारी नेमकी कोणावर करावयाची याची माहिती नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, आता सर्वाेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विनापरवानगी होर्डिंग्ज उभारलेल्या परिसरातील त्या-त्या राजकीय पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार केली जाणार आहे. पोलीस तपास करून गुन्हा दाखल करणार आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देषानुसार का असेना मनपाला विनापरवानगी होर्डिंग्ज व जाहिरातींविरोधात मोहीम उघडावी लागणार आहे.महापालिकेने ए, बी, सी व ई अशा चार वॉर्डांत प्रत्येकी पंधरा कर्मचारी व एक कनिष्ठ अभियंता असे पथक तयार केले आहे. यांच्या दिमतीला दोन डंपर व एक जेसीबी मशीन देण्यात येणार आहे. संपूर्ण शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढेपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे.- नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता)अशी आहे परवानगीची प्रक्रिया...मनपाच्या इस्टेट विभागात जाहिराती उभारण्यासाठीचे परवानगीचे अर्ज उपलब्ध आहेत. संबंधित जागेच्या अधिकार क्षेत्रातील पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेचा ‘ना हरकत दाखला’ या अर्जासोबत जोडावा लागतो. प्रति चौरस फूट ५.५० रुपये, परवाना शुल्क २० रुपये, तर जागा भाडे प्रतिदिन १५० रुपये याप्रमाणे दहा बाय दहा फूट आकाराचे होर्डिंग महिन्याभरासाठी उभारण्यास किमान सहा हजार रुपये खर्च करावे लागतात. अशा होर्डिंग्जमधून मनपाला किमान ३० लाख उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे मनपाला फक्त दीड लाखाचेच उत्पन्न मिळते.