शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

दूध उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतू नका : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:23 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर उभे असून राजकीय द्वेषातून त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा उद्योग बंद करा.

ठळक मुद्देनिवडणुकीच्या मैदानात येण्याचे सतेज पाटील यांना आव्हानमहाडिक म्हणाले, मौनी विद्यापीठास कुलूप लावून शिक्षक आणले,

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा लाख दूध उत्पादकांचे संसार ‘गोकुळ’वर उभे असून राजकीय द्वेषातून त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचा उद्योग बंद करा. महाडिक कुटुंबीयांवर टीका करण्यासाठी निवडणुकीचे मैदान आहे, तिथे या, पण काबाड कष्ट करून उभा केलेल्या संघाची बदनामी यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

महाडिक म्हणाले, मौनी विद्यापीठास कुलूप लावून शिक्षक आणले, बावड्यातील पोरांना आणून परवा मोर्चा काढला. यामध्ये शंभरही दूध उत्पादक नव्हते. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला नेत्यांनी दिला होता, पण उत्पादकांसह कर्मचाºयांनी ‘जशास तसे उत्तर’ देण्यासाठी आग्रह केल्याने ७ डिसेंबरला दुपारी बारा वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढत आहोत. अनेक संस्था, संघ, कारखाने बंद पडले ते चालविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा चांगला चाललेल्या संघाची बदनामी सुरू आहे.

मोर्चाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असे किती आले आणि गेले, पण दहा दिवसाला उत्पादकांच्या हातात पैसे देणारा संघ मोडण्याचा घाट आहे, या प्रवृत्तीला विरोध आहे. येथे आलो म्हणून काय भडका उडायचा तो उडू दे, पंपांवर धाडी टाकण्याचे उद्योग केले, आता सहा लाख उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतले जात आहे. सुपरवायझरांना फोकलून काढण्याची भाषा केली जाते, हा काय बिहार आहे का? मतभेद असतील त्याचे व्यासपीठ वेगळे आहे. निवडणुकीच्या मैदानात येऊन आरोप करा, असेही महाडिक यांनी सांगितले. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, अरुण नरके, सुरेखा शेगुंनशी, सुजाता जरग, लीला येणेचवंडी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक उपस्थित होते.‘कलम ७८’ची कारवाई मागेगाय दूध खरेदी दरात कपात केल्याबद्दल सरकारने २५ दूध संघांच्या संचालकांना ‘कलम ७८’च्या नोटिसा काढल्या होत्या; पण सरकारला आपली चूक कळली असून, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नोटिसा मागे घेण्याचे आश्वासन दिल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.उसाच्या दराचीही तुलना करा‘गोकुळ’ राज्यात सर्वाधिक दर देते, तरीही मोर्चा काढता. त्यांच्या कारखान्यात किती दर देता, ‘राजाराम’, ‘बिद्री’त तीन हजार उचल देते आणि यांचा कारखाना २६५० रुपये देतो. शेतकºयांचा एवढाच कळवळा आहे तर तीन हजार रुपये उचल द्यावी, असे महाडिक यांनी सांगितले.