शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता कुणाला ढिलं सोडायचं नाही!: नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:21 IST

कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असताना, चोर समजून आमच्या बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. आता यापुढं कुणाला ढिलं सोडायचं नाही, असा आक्रमक इशारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने मोर्चाद्वारे दिला.राईनपाडा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा इशारा ...

कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असताना, चोर समजून आमच्या बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. आता यापुढं कुणाला ढिलं सोडायचं नाही, असा आक्रमक इशारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने मोर्चाद्वारे दिला.राईनपाडा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा इशारा देण्यात आला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.दसरा चौकातून घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. ‘नाथपंथी गोसावी समाजावर अन्याय करणाऱ्या राक्षसांना फाशी द्या,’ अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. व्हीनस कॉर्नरवर मोर्चेकºयांनी रस्त्यात ठिय्या मारल्याने वाहतूक ठप्प झाली. असेंब्ली रोडवर झालेल्या सभेत मोर्चाचे प्रमुख संयोजक अनिल शिंदे म्हणाले, मूळ गावापासून शेकडो किलोमीटरवर धुळे जिल्ह्यात आमचे बांधव गेले असताना त्यांना बेदम मारहाण झाली. ते स्वत:ची ओळख सांगत असताना ते ऐकून न घेता चोर समजून त्यांना मरेपर्यंत मारहाण केली. शासनाने संबंधितांच्या परिवाराला १0 लाख दिले, पोलिसांनी ३२ जणांना अटक केली. मात्र एवढ्यावर आमचे समाधान नाही. या दोषींवर कडक कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.दादा जगताप म्हणाले, गावा-गावांत आमच्याकडे वाकड्या नजरेने बघणाºयांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे एकजूट दाखविण्याची गरज आहे.जे. के. माळी म्हणाले, शेकडो वर्षे आम्ही पारंपरिक व्यवसाय करीत असताना आमची जात गुन्हेगारी नाही. ज्यांना मारण्यात आले, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणार आहोत. जनाबाई चौगुले (जयसिंगपूर) म्हणाल्या, कुत्र्याला मारतानासुद्धा त्याचा जीव जाण्याइतपत आपण मारत नाही. मात्र इथं तर आमच्या बांधवांना ठार मारलं. आता सरकारनं ज्यांनी मारलं त्यांना फाशी देण्याचा हुकूम द्यावा.यावेळी दादा जगताप, राम साळुंखे, अशोक शिंदे (शिराळा), ईश्वर शिंदे, गजाबाई शिंदे, अण्णा शिंदे, डॉ. माळी, रमेश रुकडीकर, बाजीराव नाईक यांची भाषणे झाली. जगन्नाथ माळवे, आदिनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, सखाराम चव्हाण, प्रा. डॉ. डी. आर. भोसले यांनी तहसीलदार गुरू बिराजदार यांना निवेदन दिले.