शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवू नयेत : कोल्हापूरात आयुक्तांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 10:57 IST

कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असून या विभागातील सर्व संबंधित अधिकारी व शाखा अभियंता यांनी आपले फोन बंद ठेवायचे नाहीत, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या.

ठळक मुद्देपाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवू नयेतपाणीपुरवठा अधिकाऱ्याच्या बैठकीत आयुक्तांच्या सूचना

कोल्हापूर : शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असून या विभागातील सर्व संबंधित अधिकारी व शाखा अभियंता यांनी आपले फोन बंद ठेवायचे नाहीत, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या.कोल्हापूर शहरअंतर्गत होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत आयुक्त कलशेट्टी यांनी जल अभियंता सुरेश कुलकर्णी व शाखा अभियंता यांच्यासमवेत स्थायी समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना काळम्मावाडी पाणी योजना पूर्ण होईपर्यंत शहरातील सर्व प्रभागांत सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे लागणार आहे.

सध्या ई वॉर्डमधील काही प्रभागांचा पाणीप्रश्न गंभीर असून, त्या ठिकाणी पाणीपुरवठा कशा पद्धतीने सुरळीत करता येईल, याबाबत संबंधित शाखा अभियंता यांनी त्यावर मार्ग काढावा, असे आयुक्त म्हणाले.नगरसेवक व नागरिकांना नम्रपणे पाणी पुरवठ्याची वस्तुस्थिती समजावून सांगा. ज्या भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी शाखा अभियंता रामनाथ गायकवाड, भास्कर कुंभार, यू. जे. भेटेकर, आर. के. पाटील, राजेंद्र हुजरे, अक्षय आटकर, गुंजन भारंबे, अभिलाषा दळवी, राजेंद्र पाटील, मिलिंद पाटील, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर