मिरज : मिरजेतील गॅस्ट्रो साथीच्या पार्श्वभूमीवर अन्न, औषध प्रशासनाने महापालिका क्षेत्रातील हॉटेल्समधील दूषित अन्नपदार्थांची तपासणी मोहीम सुरू केल्याचे सहायक आयुक्त डी. एच. कोळी यांनी सांगितले. मात्र दूषित पाणी पुरवठ्याबाबत महापालिका क्षेत्रात कारवाईचे अधिकार केवळ महापालिका आरोग्य विभागालाच असल्याचेही कोळी यांनी सांगितले.दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो व अतिसाराच्या साथीने नागरिकांच्या जिवावर बेतले असतानाच, दूषित पाणी पुरवठ्याबाबत कारवाईचे अधिकार कोणाला? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अन्न व औषध प्रशासन महापालिका क्षेत्रातील खाद्यपदार्थांच्या दर्जाची तपासणी करून, ते अयोग्य आढळल्यास दंडात्मक व फौजदारी कारवाई करते. मात्र या विभागाला पाण्याच्या दर्जाच्या तपासणीचे अधिकार नाहीत. बाटलीबंद पाणी अन्न, औषध प्रशासनाकडे, तर महापालिका व नगरपालिकेकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या नळाच्या पाण्याबद्दलच्या तक्रारींचे निवारण संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागाकडेच, असा प्रकार आहे. महापालिका आरोग्य विभागातर्फे नेहमी पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येते. मात्र पाणी दूषित असल्याबद्दल आतापर्यंत कधीही महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग किवा इतरांवर कारवाई झालेली नाही. पाणीपुरवठा व तपासणी या सर्व बाबी महापालिकेकडेच असल्याने दूषित पाण्याबाबत कारवाईची भीती नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या पाण्याच्या नमुन्याची तपासणी व कारवाईचे अधिकार त्रयस्थ यंत्रणेकडे दिल्यास पाणीपुरवठ्याच्या दर्जात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. वर्षभरात अन्न व औषध प्रशासनाने मिरजेत ५० ते ६० हॉटेल्सवर दूषित अन्नपदार्थ विक्रीबद्दल कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)कारभार चव्हाट्यावर दूषित पाण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने एकाही हॉटेलवर कारवाई केलेली नाही. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार तर गॅस्ट्रोच्या साथीमुळे चव्हाट्यावर आला आहे. मात्र दूषित पाण्याबाबत महापालिकेवर कारवाई कोण करणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
पाणी तपासणीचे अधिकार नाहीतगॅस्ट्रो : औषध व प्रशासनाचे म्हणणे
By admin | Updated: November 27, 2014 23:58 IST