कोल्हापूर : व्हॉट्स अॅप, फेसबुकमुळे परस्परांतील संवाद मूक झाला आहे, अनावश्यक कॉमेंट पास होत आहे हे खरे आहे़. पण या सोशल मीडियाकडे ज्ञानार्जनाचे आणि जलद संवादाचे व्यासपीठ म्हणून पाहिले तर तो उपयुक्त ठरेल़ अशी मतमतांतरे शुक्रवारी कदमवाडी येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये ऐकायला मिळाली़ निमित्त होते ‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि ‘नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीस’तर्फे शुक्र वारी झालेल्या ‘सोशल नेटवर्किंग आयुष्याचा अविभाज्य घटक बनत चालला आहे का?’ या विषयावरील वादविवाद स्पर्धेचे़सुमारे दोन तास चाललेल्या या चर्चेमध्ये सुमारे चाळीस विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली़ व्हॉटसअॅप आणि फेसबुकमुळे आजूबाजूच्या जगाचा विसर पडला आहे, अनावश्यक कॉमेंटमुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे, अशी भूमिका काहींनी मांडली़ त्यावर भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला सोशल मीडियामुळेच व्यापक पाठिंबा मिळाला, राजकारण्यांनासुद्धा या माध्यमामुळे युवावर्गाच्या मतांचा आदर करावा लागतो, असा जोरदार युक्तिवादही करण्यात आला़ सोशल मीडियाबरोबरच स्त्री या देशात सुरक्षित आहे का, आजची शिक्षण व्यवस्था या विषयावरही विद्यार्थ्यांनी रोखठोक मते मांडली़ स्पर्धेत प्रथमेश झुरळे याने प्रथम, तर सोनाली सदरे आणि राहुल देसाई यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला़ परीक्षक म्हणून प्रा़ शबाना मेमन, प्रसन्न करमरकर यांनी काम पाहिले़ यावेळी प्रा़ के. एम़ आलास्कर, नेटसॉफ्टचे विजय सादळेकर, आदी उपस्थित होते़ लोकमत युवा नेक्स्ट आणि नेटसॉफ्ट टेक्नॉलॉजीसतर्फे शुक्र वारी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉर आॅफ दि वर्ड’ या वादविवाद स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक
सोशल मीडियाच्या आहारी जाऊ नका
By admin | Updated: February 13, 2015 23:41 IST