शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानधनवाढ न दिल्याने अंगणवाडी सेविकांचा जेलभरो-तब्बल अर्धातास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:35 IST

अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसाठी केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०१८ ला अधिसूचना काढली आहे; त्यामुळे महाराष्टÑातील अंगणवाडी सेविकांना सुमारे १२ हजार मानधन मिळणार आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे

ठळक मुद्देतीनशेहून अधिक अंगणवाडी सेविकांना ताब्यात घेऊन सुटका : मुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्र्यांचा निषेध

कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसाठी केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०१८ ला अधिसूचना काढली आहे; त्यामुळे महाराष्टÑातील अंगणवाडी सेविकांना सुमारे १२ हजार मानधन मिळणार आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तब्बल अर्धा तास रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन केले.

पोलिसांनी तीनशेहून अधिक महिलांना ताब्यात घेऊन सुटका केली. ताब्यात घेताना दोघांमध्ये झटापटही झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.दुपारी १२ च्या सुमारास महावीर उद्यान येथून कॉ. आप्पा पाटील व जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील अंगणवाडी सेविकांनी धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर रास्ता रोको करून ठिय्या मारण्यात आला. या ठिकाणी आंदोलकांनी मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्र्यांसह सरकारविरोधात धिक्काराच्या घोषणा देत तीव्र निदर्शने करून परिसर दणाणून सोडला.

आप्पा पाटील म्हणाले, सरकारने मानधनवाढीची अधिसूचना काढूनही त्याची अंमलबजावणी न केल्याने जेलभरो आंदोलन केले जात आहे. अंगणवाडी सेविकांच्या सेवासमाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करावी. ३० एप्रिल २०१४ नंतर सेवा संपलेल्या अंगणवाडी सेविकांची आजपर्यंत न दिलेली लाभाची रक्कम त्वरित द्यावी. मानधनाच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी. अंबे्रला योजनेतील सुधारित दर लागू करावेत. विमा योजनांची अंमलबजावणी करावी. पाच व १0 वर्षांच्या वाढीव मानधनाची फरकासह रक्कम द्यावी, अशा विविध मागण्यांकडेही शासनाने दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे सरकारविरोधातील उद्रेक या आंदोलनातून व्यक्त केला जात आहे.

तब्बल अर्धातास सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये नेत असताना झटापटही झाली. तीनशेहून अधिक अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन व्हॅनमधून कनाननगर परिसरातील तावडे लॉन येथे नेऊन सोडले. आंदोलनात शोभा भंडारे, सुनंदा कुºहाडे, मंगल माळी, पुष्पा वाळके, सुरेखा कोरे, विद्या कांबळे, रेखा कांबळे, आदींसह अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. मानधनवाढीसह इतर मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल अर्धा तास रास्तारोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री यांच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शनेही केली. (छाया : नसीर अत्तार)अंगणवाडी आंदोलन ०२/०३/०४/०५फोटोओळी : मानधनवाढीसह इतर मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल अर्धा तास रास्तारोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना ताब्यात घेताना (छाया : नसीर अत्तार) 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप