शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

दबावाला बळी न पडता आराखडा राबवा

By admin | Updated: July 3, 2016 00:49 IST

अंबाबाई मंदिर विकास : १९ मान्यवरांच्या सूचना

कोल्हापूर : राजकीय दबावाला बळी न पडता आराखडा राबवावा, अशा सूचना करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आराखड्यावर नागरिकांनी केल्या आहेत. आतापर्र्यंत १९ जणांनी हरकती व सूचना महापालिकेकडे दाखल केल्या. यात खासदार धनंजय महाडिक यांच्यासह आर्किटेक्ट असोसिएशन, विविध संस्था, संघटना, नगरसेवकांचा समावेश आहे. अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा २४ जूनला सादर झाल्यानंतर याबाबतच्या हरकती व सूचना शुक्रवारअखेर मागविल्या होत्या. या दिवसापर्यंत १९ जणांनी विविध हरकती व सूचना मांडल्या आहेत. त्यांचा अहवाल दोन दिवसांत महापालिकेचे प्रकल्प अधिकारी सुरेश पाटील फोट्रेस कंपनीला पाठविणार आहेत. तो आयुक्त पी. शिवशंकर व जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनाही सादर देण्यात येणार आहे. या सूचनांचा विचार करून पुढील बैठक ठरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) दर्शन मंडप व बाह्य परिसरात पाण्याची व स्वच्छतागृहांची सोय, चारही दरवाजे खुले ठेवावेत, शाहू मिल जागेचा आराखड्यात समावेश करून तेथे ५०० खोल्यांचे भक्त निवास, मोफत अन्नछत्राची सोय करावी, साऊंड लाईट, लेझर शोद्वारे कोल्हापूरची माहिती, अ‍ॅम्फी थिएटर, कुटिरोद्योग, गूळ, काकवी, दागिने, चप्पल, मसाल्यांची बाजारपेठ उभारावी. - खासदार धनंजय महाडिक महत्त्वाच्या सूचना अशा : ४नगरसेवक आशिष ढवळे : मध्यवर्ती बसस्थानक रिक्षा स्टॉप येथे मल्टिलेव्हल पार्किंग करावे. ४अवधूत सरनाईक : मंदिराच्या भिंतीलगतच्या मिळकतधारकांना स्थलांतरित करावे, रिक्षा स्टॉप, फेरीवाले यांच्यापासून भवानी मंडप मुक्त करावे, कपिलेश्वरसह अन्य मंदिरांचा विकास व्हावा. ४आप्पा लाड : व्यापारी संकुल उभारून येथे कोल्हापूरची खासियत असलेल्या वस्तूंची विक्री व्हावी. ४नगरसेवक शेखर कुसाळे : बाबूजमाल समोर मल्टिलेव्हल पार्किंग व व्यापारी संकुल उभारावे. ४संजय पाटील, जयेंद्र दळवी, राहुल वारे : महाद्वार, घाटी दरवाजा परिसर मोकळा करावा, शहरात दिशादर्शक फलक उभारावेत, अन्य तीर्थस्थानांचा विकास व्हावा. ४महालक्ष्मी ज्येष्ठ नागरिक संघ : विद्यापीठ हायस्कूल येथे यात्री निवास उभारावे, ओवऱ्यातील दुकाने हटवावीत, कोल्हापूर दर्शन बससेवा सुरू करावी, बिंदू चौक ते भवानी मंडप स्काय वॉक नको. ४नगरसेवक किरण नकाते : नगरप्रदक्षिणा, गणेश मिरवणूक मार्गावर अंडरग्राऊंड वायरिंग करावे. ४कृष्णराव निकम : स्काय वॉकची गरज नाही. याशिवाय नगरसेवक अजित ठाणेकर, सचिन चव्हाण, श्री अंबाबाई भक्त समिती, आर्किटेक्ट असोसिएशन, कोल्हापूर जनशक्ती, महाद्वार रोड फेरीवाले संघटना यांनी लेखी हरकती नोंदविल्या आहेत.