शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बी लावणाºयांची हयगय नाही : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 14:27 IST

कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणाºयांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. शेतकरी तंबाखू संघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शुक्रवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरी येथे घडलेल्या प्रकाराने दु:ख झाल्याचेही सांगितले. समाज एकत्र यावा, त्यातून प्रबोधन ...

ठळक मुद्देराजारामपुरीतील प्रकाराचे दु:ख पोलीस कठोर भूमिका बजावणारमंडळांनी कायदा समजावून घेऊन शांततेत गणेशोत्सव पार पाडावाहरियाणातील घटनेने धक्का

कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणाºयांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. शेतकरी तंबाखू संघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शुक्रवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरी येथे घडलेल्या प्रकाराने दु:ख झाल्याचेही सांगितले. समाज एकत्र यावा, त्यातून प्रबोधन व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. गणेशोत्सवासारख्या आनंदाच्या क्षणी गाणी कोणती लावावीत, वाद्ये कोणती वाजवावीत हा मंडळांचा प्रश्न आहे. पण त्यामुळे समाजाला त्रास व  धोका होईल, असे करणे चुकीचे आहे.

गणेशोत्सवाला शंभर वर्षे पुर्ण झाल्याने नाना पाटेकर यांच्या सारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे. तरीही असे प्रकार घडत असतील तर काय बोलावे. आगामी दहा दिवस गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणूकही शांततेत पार पाडावी. मिरवणूक व वाद्यांबाबत पोलीस शनिवारी सगळ्या मंडळांना परिपत्रक काढणार आहेत. तरीही डॉल्बी लावण्याचा कोणी प्रयत्न  केला तर प्रशासन हयगय करणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. डॉल्बी बाबतची कलमे पाहिली तर त्यामध्ये अनेक तरूणांची आयुष्य बरबाद होतील, पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. त्यामुळे मंडळांनी कायदा समजावून घेऊन शांततेत गणेशोत्सव पार पाडावा, असे आवाहन करत जे कायदा पाळणार नाहीत त्यांच्याबाबतीत कठोर भूमिका घ्यावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. हरियाणातील घटनेने धक्काहरियाणा व पंजाब मध्ये राम रहीम सिंग यांच्या शिक्षेवरून घडलेला हिसांचाराची घटना निश्चितच धक्कादायक आहे. महाराष्टÑातही त्यांचे काही अनुयायी असल्याने असा प्रकार होऊ नये, यासाठी सरकार सज्ज असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.