शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

डच्चू नाही..राजीनामा दिला

By admin | Updated: May 19, 2016 00:41 IST

शेतकरी संघातील राजकारण : मानसिंगराव जाधव यांचे म्हणणे; मनमानीस चाप लावल्याचा म्होरक्यांना राग

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचा कारभार काटकसरीने केला असून, संघाचे नुकसान होईल असे एकही कृत्य कार्यकारी संचालक म्हणून केलेले नाही; परंतु काही ‘म्होरक्यां’च्या मनमानीस चाप लावल्यानेच त्यांना मी या पदावर नको होतो, म्हणून विरोध सुरू झाल्यामुळे त्यांनी मला काढून टाकण्याऐवजी मी स्वत:हूनच राजीनामा दिला असल्याची माहिती संघाचे संचालक मानसिंगराव जाधव यांनी दिली.मंगळवार (दि. १७)च्या अंकात ‘लोकमत’मध्ये संघाच्या कार्यकारी संचालक पदावरून डच्चू देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबद्दलची वस्तुस्थिती स्वत: जाधव यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयात येऊन दिली. ते म्हणाले, ‘मी गेली नऊ वर्षे संघाचा संचालक आहे. माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते यांच्यासमवेत काम करीत असताना सातत्याने संघाच्या हिताचाच विचार केला. त्यामुळेच आम्ही सात टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत लाभांश देऊ शकलो. कार्यकारी संचालक म्हणून गेल्या नऊ महिन्यांत केलेल्या कामामुळे संस्थेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. या काळातील सेवेचा मी एक पैसाही मोबदला घेतलेला नाही. संघाचे वाहन उपलब्ध होते; परंतु त्याचा वापर मी फक्त कार्यालयात येण्या-जाण्यासाठीच केला. इतरवेळी मी स्वत:चे वाहन वापरत असे. संघाच्या सभासदांना माझ्या कामाबद्दल विश्वास होता म्हणूनच मी गेल्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झालो. माझे हात स्वच्छ आहेत आणि कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकेल, असा एकही व्यवहार माझ्याकडून झालेला नाही.’संघाच्या मासिक बैठकीत जेव्हा माझ्याकडे राजीनामा मागण्यात आला तेव्हा तो मी तातडीने दिला आहे. कार्यकारी संचालक पदावरून दूर झालो तरी संघाचा संचालक म्हणून मी संस्थेत राहणार आहेच; त्यामुळे खरी लढाई आता सुरू झाली आहे, असे जाधव यांनी सांगितले.कार्यकारी संचालक पदावर मी असल्याने काहींच्या हितसंंबंधांना बाधा येऊ लागली होती. कुंभी-कासारी कारखान्यावरील संघाच्या गोदामाच्या दुरुस्तीचे काम करायचे होते. रीतसर इस्टिमेट मागवून ते करावे, असे सुचविले होते; परंतु दोन लाख १० हजार रुपयांचे हे काम एकच कोटेशन घेऊन आम्ही सांगतो त्या व्यक्तीस द्यावे, असा आग्रह काहींनी केला. तो मी मान्य केला नाही.संघाच्या पुनाळ शाखेत सुमारे एक लाख ७५ हजारांचा गैरव्यवहार झाला आहे. बिद्री शाखेत सुमारे सात लाखांचा गैरव्यवहार झाला आहे. पुनाळ शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. बिद्री शाखेतील गैरव्यवहाराची रक्कम संबंधित व्यवस्थापकांकडून भरून घेऊन मगच चौकशी सुरू करावी, असे संचालक मंडळाच्या बैठकीतच ठरले होते. परंतु, या दोन्ही शाखांच्या व्यवस्थापकांच्या वेतनवाढी रोखून त्यांना कामावर घ्यावे, असा आग्रह होता. त्यास मी विरोध केला. ज्यांनी गैरव्यवहार केला आहे, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असे माझे म्हणणे होते.