शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

तत्त्वांशी तडजोड करू नका, कष्ट करा: तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:21 IST

कोल्हापूर : कौटुंंबिक, सामाजिक परिस्थितीचा बाऊ करू नका. आपण काय काम करू शकतो, हे लक्षात घेऊन कार्यरत राहा. आपल्या ...

कोल्हापूर : कौटुंंबिक, सामाजिक परिस्थितीचा बाऊ करू नका. आपण काय काम करू शकतो, हे लक्षात घेऊन कार्यरत राहा. आपल्या तत्त्वांशी कधी तडजोड करू नका. कष्टाची तयारी ठेवा, असे आवाहन आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी रविवारी येथे तरुणाईला केले.कोल्हापूर येथील केआयटी महाविद्यालयाच्या ‘वॉक विथ वर्ल्ड’तर्फे आयोजित ‘अभिग्यान २०१९’मध्ये सामाजिक, प्रशासकीय, आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींसमवेत संवाद साधला.आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे, ‘पूर्णब्रह्म’ ही महाराष्ट्रीय फूड चेन सुरू करणाऱ्या जयंती कठाळे, इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सल्लागार प्रभाकर देवधर, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, खासगी वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी साधलेल्या संवादामुळे तरुणाई भारावून गेली. या कार्यक्रमात मुंढे म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी रोज आठ ते दहा तासांचा अभ्यास पुरेसा आहे; पण चोवीस तास त्यातील यशाबाबतचा विचार मनात असायला हवा. प्रशासकीय सेवेत यायचे असल्यास परीक्षार्थी व्हा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ती परीक्षा कशासाठी घेतली जाते, त्याचा अभ्यास करा. शासकीय सेवेतील पदावर गेल्यानंतर माणसाला माणूस म्हणून न्याय द्यायचा आहे, फक्त एवढा विचार करून कार्यरत रहा. समाजासाठी चांगल्या गोष्टी करा; म्हणजे तुम्हाला इतरांपुढे झुकावे लागणार नाही. जयंती कठाळे म्हणाल्या, स्वप्नांचा वेध घ्या, त्यांना मर्यादा घालू नका. तुम्ही कसे दिसता आणि कसे राहता याचा तुमच्या कामावर काही परिणाम होऊ देऊ नका. आपली रेषा मोठी करा. दुसऱ्याची लहान करण्यात तुमचे कष्ट वाया घालवू नका. वेळेची आणि माणसांची वाट पाहू नका. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, ते आजच सुरू करा. प्रभाकर देवधर म्हणाले, केवळ पैसा मिळविण्यासाठी नव्हे, तर नवीन काही शोधण्यासाठी शिक्षण घ्या. त्यातूनच तुमची नवी आणि वेगळी ओळख निर्माण होणार आहे.राष्ट्रबांधणीची भूमिका, सर्वांवर प्रेममुलाखतीतील जलद प्रश्नांची उत्तरे मुंढे यांनी दिली. पंतप्रधान झाला तर काय भूमिका असणार या प्रश्नावर त्यांनी राष्ट्रबांधणीची भूमिका राहणार असे उत्तर दिले. कोणतीही गोष्ट प्रेमानेच करतो. तणाव, अडचण आल्यावर पत्नीशी संवाद साधतो. चित्रपटाचे नायक म्हणून व्हिलन सोडून कोणतीही भूमिका करेन. माणूस ओळखणे ही सर्वांत अवघड गोष्ट, अशी उत्तरे त्यांनी दिली.