शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय किचन पद्धत स्वीकारू नका, पोषण आहार कामगार संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:46 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भात येऊ घातलेली केंद्रीय किचन पद्धत रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणेच बचत गट तसेच सध्या काम करणाऱ्या महिलांनाच काम देण्याच्या मागणीकरिता शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी बचतगटांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.

ठळक मुद्देकेंद्रीय किचन पद्धत स्वीकारू नका पोषण आहार कामगार संघटनेचा मोर्चा

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भात येऊ घातलेली केंद्रीय किचन पद्धत रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणेच बचत गट तसेच सध्या काम करणाऱ्या महिलांनाच काम देण्याच्या मागणीकरिता शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी बचतगटांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.महानगरपालिकेच्या सर्व शाळांतून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यासंदर्भात शासकीय स्तरावर दबाव आणला जात आहे. यापूर्वीच महापालिका सर्वसाधारण सभेत अक्षयपात्र संस्थेला आहार पुरविण्याचे काम देण्यासंदर्भातील प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. मात्र शासनाकडून ‘अक्षयपात्र’ला ठेका देण्याबाबत सतत विचारणा होत आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढून महापौर, उपमहापौर यांना निवेदन देण्यात आले.महापौर मोरे व उपमहापौर शेटे यांनी मोर्चाला सामोरे जाऊन त्यांचे म्हणणे ऐकले. तसे निवेदन स्वीकारले. केंद्रीय किचन पद्धत स्वीकारून ‘अक्षयपात्र’ला ठेका देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच नामंजूर केला असून, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही त्यांनी मोर्चेकऱ्यांना दिली. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील, शहराध्यक्षा वर्षा कुलकर्णी, शहर सेक्रेटरी अश्विनी साळोखे यांनी केले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर