शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम प्रभावीपणे करा : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:28 IST

यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केली.

ठळक मुद्देपीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम प्रभावीपणे करा : दौलत देसाई खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत सूचना

कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहामध्ये जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वआढावा बैठक ीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी महाविद्यालयाचे डॉ. मोहिते, ‘नाबार्ड’चे नंदू नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने उपस्थित होते.ते म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून यामध्ये सोयाबीन, भुईमूग, नाचणी, ज्वारी अशा महत्त्वाच्या पिकांचा अंतर्भाव आहे. पीक उत्पादकता वाढविण्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या काटेकोर नियोजनासोबतच पावसास होणारा विलंब अथवा प्रमाणाबाहेरचा अधिक पाऊस या गोष्टींचा विचार करून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे नियोजन व आराखडा तयार ठेवावा.

हुमणी/अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व जनजागृतीसाठी ठिकठिकाणी सर्कलनिहाय शेतकऱ्यांसाठी कार्यशाळांचे नियोजन करावे व तसा नियोजन आराखडा सादर करावा. हुमणीवरील उपाययोजनेबाबत जनजागृतीसाठी ग्रामपंचायतीमध्ये माहितीफ्लेक्स लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आपली शेती ही डोंगराळ भागामध्ये जास्त असल्याने मिनी शुगरकेन हार्वेस्टिंगचा विचार व्हावा व कृषिपूरक उद्योग-व्यवसायाचाही विचार व्हावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.अमन मित्तल म्हणाले, शेतीसाठी पाणी व रासायनिक खतांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आरोग्यास हानी पोहोचत असल्याचे दिसून येत असल्याने सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे.

गटशेतीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन पीक उत्पादकतेचा विचार करणे आवश्यक आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर