शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पर्यटनवृद्धी करू

By admin | Updated: November 12, 2014 00:27 IST

धनंजय महाडिक : धार्मिक स्थळे, धबधबे, हिलस्टेशन विकसित करणार

कोल्हापूर : जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिले आहे. इथे धार्मिकस्थळे, किल्ले, गड, आकर्षक धबधब्यांचे विपुल जलवैभव, लँड टेबल्स, हिलस्टेशन्स आहेत, परंतु ही सर्व ठिकाणे विकसित नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पुरातत्व विभाग, एमटीडीसी यांना सोबत घेऊन जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर आणू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी येथे दिली.पर्यटनाशी संबंधित घटकांची खा. महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पर्यटनासंदर्भात सादरीकरण झाले.कोल्हापूर जिल्हा हा निसर्गसंपत्तीने नटलेला आहे. सह्याद्रीच्या रांगा, मसाई पठारसारखे लॅँड टेबल्स, हिरवाईने संपन्न असलेला गगनबावडा परिसर, बर्की, आंबोली, चंदगड, आजरा, आंबा आणि अन्य ठिकाणीही नैसर्गिक धबधबे आहेत. त्याचबरोबर महालक्ष्मी मंदिर, जोतिबा मंदिर, आरेचे महादेव मंदिर, नृसिंहवाडी, खिद्रापूर अशी धार्मिक स्थळेही आहेत. भुदरगड, रांगणा, विशाळगड, पन्हाळा यासह अनेक छोटे-मोठे गड-किल्ले आहेत तरीही पर्यटनाच्या नकाशावर जिल्ह्याचे अस्तित्व नगण्य आहे. ही बाब जाणून घेऊन खासदार धनंजय महाडिक यांनी परिस्थितीमध्ये बदल घडविण्यासाठी पर्यटनवाढीच्या दृष्टीने संबंधित घटकांची बैठक घेतली.यामध्ये वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांनी जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने असणारी शक्तिस्थळे आणि मर्यादांचे विवेचन केले. त्याचबरोबर सादरीकरणाद्वारे अनेक संधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. पुरातत्व खात्याचे सहाय्यक संचालक व्ही. एन. कांबळे यांनी खात्याच्या अटी आणि उपलब्ध सोयी-सुविधा याबाबत माहिती दिली. उद्योजक मोहन मुल्हेरकर आणि उज्ज्वल नागेशकर यांनी प्रत्यक्ष गुऱ्हाळघराला पर्यटकांनी भेटी देण्याची संकल्पना मांडली तसेच कोल्हापुरी चप्पल तयार होणाऱ्या ठिकाणांचा यात समावेश करता येईल, असेही सांगितले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी भवानी मंडप इथे सांस्कृतिक ठेवा जतन करून तिथे ‘हेरिटेज वॉक’ तयार करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले.कोल्हापूरची पर्यटनवाढीची क्षमता प्रचंड असली तरी सध्या फारशा सोयी-सुविधा नसल्याने त्याला मर्यादा येत असल्याचे निरीक्षण खा. महाडिक यांनी नोंदविले. यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी उत्तम कांबळे, सचिन शानभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. जाधव, हॉटेल-मालक संघाचे सिद्धार्थ लाटकर, योगेश कुलकर्णी, मिलिंद धोंड, यशोराज पाटील आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)