शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Kolhapur : कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करा : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 12:50 IST

CoronaVirus In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णदर कमी होण्यासाठी तपासण्या वाढविण्यात याव्यात. नेमून दिलेले उद्दिष्ट साध्य करावे. झालेल्या तपासण्यांची माहिती तत्काळ ऑनलाईन भरावी. या कामात हलगर्जीपणा होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्दे ऑनलाईन नोंदी करण्यात हलगर्जीपणा करू नका : जिल्हाधिकारी दौलत देसाईकोरोना प्रतिबंधाबाबत ऑनलाईन बैठक

कोल्हापूर: जिल्ह्यातील कोरोना रुग्णदर कमी होण्यासाठी तपासण्या वाढविण्यात याव्यात. नेमून दिलेले उद्दिष्ट साध्य करावे. झालेल्या तपासण्यांची माहिती तत्काळ ऑनलाईन भरावी. या कामात हलगर्जीपणा होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले.जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या तपासण्या, ऑनलाईन माहिती भरणे, संपर्क शोध, आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहूजी सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ते बोलत होते. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. रोज १५ हजारांहून अधिक तपासण्या होत आहेत.

शहरासह ग्रामीण भागात तपासण्यांची संख्या वाढवून उद्दिष्ट पूर्ण करा. त्या-त्या भागासाठी देण्यात आलेल्या 'टेस्टिंग किट्स' मधून आतापर्यंत झालेल्या तपासण्यांच्या नोंदी व शिल्लक किट्सची माहिती वेळोवेळी सादर करा. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीचे (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) प्रमाण वाढवावे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. उद्दिष्ट पूर्ण न केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. एन. देवकर, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, अश्विनी सोनवणे-जिरंगे, आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले.सूक्ष्म नियोजनाने काम कराजिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट कमी होण्यासाठी संबंधित तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांनी ह्यसूक्ष्म नियोजनह्ण करून समन्वयाने काम करावे. अधिकाधिक नागरिकांच्या तपासण्या करून घेऊन 'डाटा एन्ट्री' करावी. या कामासाठी आवश्यक ते मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून द्यावे, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर