कायद्याचा अभ्यास असलेले मुरुगन हे तब्बल ४४ वर्षे राजकारणात आहेत. गेल्या वर्षी त्यांची पक्षाच्या महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. ‘द्रमुक’मध्ये या पदाला मोठा मान आहे. एम. करुणानिधी यांच्या खास मर्जितले म्हणून मुरुगन यांना मानले जात होते. एम. करुणानिधींच्या निधनानंतर पक्षाची संपूर्ण जबाबदारी त्यांचे सुपुत्र एम.के. स्टॅलिन आणि मुरुगन पार पाडत आहेत. यावर्षी स्टॅलीन यांनी निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच प्रचाराचा धडाका लावला आहे.
२०१६ ची शेवटची निवडणूक!
२०१६ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मुरुगन यांनी आपली ही शेवटची निवडणूक असेल, असे जाहीर केले होते; परंतु आता ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता या निवडणुकीत जनता त्यांना कसा कौल देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.