शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

सीमेवरील जवानांसमवेत अंधांची दिवाळी

By admin | Updated: November 22, 2015 00:46 IST

आगळावेगळा उपक्रम : हुसेनीवाला सीमेवर साजरी केली दिवाळी

चंद्रकांत कित्तुरे ल्ल कोल्हापूर दिवाळी कुटुंबीयांसमवेत साजरी करण्यातच आपण धन्यता मानतो मात्र सतीश नवले हे गेल्या तेरा वर्षा$ंपासून सीमेवरील जवानांसमवेत दिवाळी साजरी करीत आहेत. ते स्वत: अंध असून यंदाही त्यांनी आपल्या तीन अंध सहकाऱ्यांसमवेत पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला सीमेवर सुरक्षा दलाच्या जवानांसमवेत दिवाळीचा आनंद लुटला. प्रेरणा असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेतर्फे सतीश नवले दर दिवाळीला सीमेवरील जवानांसमवेत ‘वीर वंदन’ हा कार्यक्रम करतात. सणवार आपण मोठ्या उत्साहाने साजरे करतो. सीमेवरील जवान मात्र या उत्सव काळात कुटुंबीयांपासून लांब राहून ते देशाचे संरक्षण करीत असतात. एक नागरिक म्हणून आपणही त्यांचे काही देणे लागतो. १९९९ मध्ये नववीत असताना भारत-चीन युद्धावरचे पुस्तक वाचून मला ही कल्पना सुचली. २००३ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिला मूर्त रूप दिले. पहिली सहा वर्षे मी एकटाच सीमेवर जात होतो. २००९पासून अंध आणि डोळस मित्रांचा एक ग्रुप तयार केला आणि त्यांच्या समवेत जाऊ लागलो, असे तो सांगतो. मिलिंद कांबळे (कॉर्पोरेशन बँक पुणे), महाराष्ट्र बँक अधिकारी प्रवीण उछवा (चाळीस गाव, जि. जळगाव), पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील बी.ए. भाग तीनची विद्यार्थिनी वर्षा वीर हे तीन अंध आणि आय. टी. इंजिनीअर सुजय कुलकर्णी आणि पुण्यातील एम.सी.ए.चा विद्यार्थी समीर शेख या दोन डोळस मार्गदर्शकांसमवेत भाऊबिजेदिवशी यंदा हुसेनीवाला सीमेवर सतीश पोहोचला. तेथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसमवेत दोन तासांचा दिवाळी भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे भारत-पाकिस्तान युद्धाला ५0 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लहान-मोठे आकाराचे ५0 राष्ट्रध्वज तेथे देण्यात आले. हे ध्वज पुण्यातील जागृती सोशल फाउंडेशनने दिले होते. तसेच कोल्हापुरातील वायल्डर मेमोरिअल चर्चने जवानांसाठी खास दिवाळीचा फराळ दिला होता. या भेटी जवानांना देण्यात आल्या. या वेळी सीमा सुरक्षा दलाचे असि. कमांडंट भूपेंद्र सिंग, फिरोजपूरचे पोलीस अधीक्षक केतन बजरंग पाटील यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि जवान उपस्थित होते. आपल्याला घरी कधीच दिवाळी साजरी करायला मिळत नाही; पण तुमच्यामुळे आम्हाला दिवाळीचा आनंद लुटता आला, अशा भावना व्यक्त करताना अनेक जवानांचे डोळे भरून आले होते. आम्ही अंध असलो तरी त्यांच्या स्पर्शातून आणि बोलण्यातून आम्हाला ते जाणवत होते, असे सतीश सांगतात. आपल्याला यासाठी सरहद्द संस्थेचे संजय नहार, नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागर, पुष्पक सिमेंटचे सुनील शहा यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले. कोण आहेत सतीश नवले? मूळचे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरेचे आणि सध्या कोल्हापुरात राहत असलेल्या सतीश नवले यांनी ‘कम्युनिटी रेडिओ चालविणारा देशातील पहिला अंध’ ठरण्याचा बहुमान मिळविला आहे. सांगली जिल्ह्यातील येरळावाणी कम्युनिटी रेडिओ या केंद्राचा इन्चार्ज म्हणून त्यांनी सुमारे दीड वर्ष काम केले. यानंतर अंधांसाठी अंधांचे ब्रेलवाणी हे एक स्वतंत्र कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरू केले. नेत्रदानाचा संकल्प दीपोत्सवाचा कार्यक्रम खूपच भारावून टाकणारा होता. या कार्यक्रमात सुमारे १00 जवानांनी नेत्रदानाचा संकल्प सोडला, असे सतीश नवले यांनी सांगितले.