शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

घटस्फोटावरून विवाहितेचा गोंधळ, तक्रार मागे न घेण्यावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 15:21 IST

Court Kolhapur- घटस्फोट देण्यासाठी तसेच पोलिसांतील तक्रार मागे घेण्यासाठी नातेवाईक दबाव टाकत असल्याचा आरोप करीत एका विवाहितेने कसबा बावडा रोडवर न्यायसंकुलाच्या परिसरात गोंधळ माजविला. नातेवाइकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गोंधळाचे वातावरण झाल्याने शाहूपुरी पोलीसही तातडीने तेथे पोहोचले व त्यांनी विवाहितेस पोलीस ठाण्यात नेले. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

ठळक मुद्देतक्रार मागे न घेण्यावर ठाम न्यायसंकुलाच्या परिसरातील घटना

कोल्हापूर : घटस्फोट देण्यासाठी तसेच पोलिसांतील तक्रार मागे घेण्यासाठी नातेवाईक दबाव टाकत असल्याचा आरोप करीत एका विवाहितेने कसबा बावडा रोडवर न्यायसंकुलाच्या परिसरात गोंधळ माजविला. नातेवाइकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गोंधळाचे वातावरण झाल्याने शाहूपुरी पोलीसही तातडीने तेथे पोहोचले व त्यांनी विवाहितेस पोलीस ठाण्यात नेले. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, एका परगावच्या तरुणीचा दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरात तरुणाशी विवाह झाला होता; पण काही दिवसांपासून विवाहिता ही माहेरीच राहत होती. तिने पतीसह घरच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी नातेवाइकांनी तडजोडीचे प्रयत्न सुरू होते. अखेर आर्थिक नुकसान भरपाई देण्यावर एकमत झाले.

पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी नातेवाइकांनी तिच्याशी चर्चा केली. मंगळवारी दुपारी नातेवाईक तिला घेऊन कसबा बावडा रोडवरील न्यायसंकुलात आले. तेथेही तिची समजूत काढताना, तिला तक्रार मागे घे व घटस्फोटही दे असा दबाव टाकल्याने तिने गोंधळ माजविला.

संबंधित विवाहितेने, मला दोन वर्षे त्रास झाला आहे, त्याची किंमत पैशात करू नका, मी तक्रार मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. गोंधळ निर्माण झाल्याने नातेवाइकांनी तेथून काढता पाय घेतला. तातडीने शाहूपुरी पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी विवाहितेस तक्रार नोंदविण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेले.

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर