शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण, तुळजाभवानी प्रभागातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:47 IST

महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याच मोबाईलवर तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

ठळक मुद्देगढूळ पाण्यामुळे नागरिक हैराणतुळजाभवानी प्रभागातील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या तुळजाभवानी मंदिर प्रभागातील नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल न घेतल्यामुळे प्रभागाचे नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याच मोबाईलवर तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.तुळजाभवानी मंदिर प्रभागातील ११ कॉलनींमध्ये तसेच साने गुरुजी वसाहतीमधील काही कॉलनींमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा १५ दिवस बंद पडला होता. त्यानंतर तो सुरू झाला; पण अनेकांच्या नळाद्वारे गढूळ पाणी येऊ लागले.

नळाला येणारे पाणी प्रक्रिया न करता थेट नदीतून उचलून सोडले जाते की काय, इतके लालभडक पाणी नळाला येते. कधीकधी काळपट पाणी येते. एखादी कळशी पाण्याने भरून ठेवली की संध्याकाळपर्यंत तिच्या तळाला तांबड्या मातीचा थर साचलेला असतो.

या गढूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गॅस्ट्रो तसेच अन्य पोटाच्या विकारांनी नागरिक हैराण होऊ लागले आहेत. खासगी दवाखान्यात उपचाराला येणाऱ्या दहापैकी आठ रुग्ण पोटविकाराचे आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पाण्यातील माती जाऊन नागरिकांचे फिल्टरही खराब होत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या गढूळ पाणी पुरवठ्याबाबत नागरिक प्रभागातील नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्याकडे तक्रार करीत आहेत. दिंडोर्ले हे संबंधित शाखा अभियंता यांच्याकडे तक्रार करतात. अधिकारी ऐकून घेतात; पण काम काहीच करीत नाहीत. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी त्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नगरसेवक दिंडोर्ले यांनीही अधिकाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.गुरुवारी तर नगरसेवक दिंडोर्ले यांनी प्रभागातील नागरिकांना आयुक्तांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. पाणी गढूळ येणे, कमी दाबाने येणे, वेळेवर न येणे अशा प्रकारच्या तक्रारी होत असून मी वारंवार जल अभियंता, उपजल अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे; परंतु त्यांच्याकडून तितकासा प्रतिसाद मिळत नाही. आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणे गरजेचे आहे. पण त्या आधी नागरिकांनी आयुक्त यांच्याकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन दिंडोर्ले यांनी केले आहे. 

 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर