शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा काँग्रेसमध्ये टोळी करून डावलले

By admin | Updated: April 2, 2017 00:39 IST

प्रकाश आवाडे : निर्णय घेतला नसता तर गट नेस्तनाबूत झाला असता

इचलकरंजी : आवाडे गटाने घेतलेला निर्णय योग्य असून, त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. हा निर्णय आता घेतला नसता तर आमचा गट नेस्तनाबूत झाला असता. जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या दळभद्री नेत्यांनी टोळी करून आवाडेंना डावलले. त्याचा हिशेब चुकता करून आज जिल्हा परिषदेत आम्ही महत्त्वाच्या भूमिकेत आहोत, असे मत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले.कॉँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याच्या एकसष्टी समारंभानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकाश आवाडे पुढे म्हणाले, आमच्या दोन सदस्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य एकत्रित असून, जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडीतही आमची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालण्याचे दिवस गेले असून, आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. आम्ही नव्याने वाट तयार केली असून, त्या वाटेवरून वाटचाल करीत लवकरच त्याचा हाय-वे केला जाणार आहे.कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या नेतेमंडळींनी कॉँग्रेसची पार्श्वभूमी व इतिहास विसरला असल्याची टीका केली. तसेच जिल्हा कॉँग्रेसमध्ये इचलकरंजी कॉँग्रेसचे योगदान पूर्वीपासूनच मोलाचे राहिले आहे. याचा विसर पडल्याने तसेच व्यक्तीद्वेषातून डावलल्याची खंत व्यक्त केली. यावेळी राहुल आवाडे, प्रकाश मोरे, अशोक आरगे, शशांक बावचकर, आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)