शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा उपनिबंधक घेणार अवसायकांची झाडाझडती बैठक मंगळवारी : बँकांच्या अवसायकांचाही घेणार आढावा--लोकमत इफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:14 IST

कोल्हापूर : ‘भुदरगड’, ‘तपोवन’, ‘मानिनी’सह पाच अवसायनातील पतसंस्थांच्या कामकाजाची मंगळवारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे झाडाझडती घेणार आहेत.

कोल्हापूर : ‘भुदरगड’, ‘तपोवन’, ‘मानिनी’सह पाच अवसायनातील पतसंस्थांच्या कामकाजाची मंगळवारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे झाडाझडती घेणार आहेत. पतसंस्थांसह अवसायनातील बॅँकांचाही आढावा घेतला जाणार असून, केवळ चालढकल करणाºया अवसायकांवर थेट कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

आयुष्यभर काबाडकष्ट करून जमविलेली पुंजी भविष्यासाठी मोठ्या विश्वासाने पतसंस्थांमध्ये ठेवली. आपल्या आजूबाजूची माणसेच या संस्थांचे कारभारी असल्याने ठेवीदार निर्धास्त होते; पण जवळच्या माणसांच्या कारनाम्याने संस्था अडचणीत आल्या आणि ठेवीदार अडकले. कोणत्याही वित्तीय संस्थेचा ठेवीदार हा आत्मा असतो. त्याच्या जिवावरच संस्थेची उलाढाल होऊन प्रगती होते; पण आत्म्यावरच डल्ला मारण्याचे काम काही संस्थाचालकांनी केल्याने सहकारावरील विश्वासार्हता संपत चालली आहे. ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यात बदल झाला; पण त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच संस्थांमध्ये गैरव्यवहार करण्यास बळ मिळत आहे. अवसायक नेमल्यानंतर वास्तविक उपनिबंधकांनी दर दोन महिन्याला त्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे अपेक्षित असते; पण वर्षात एकदा तरी आढावा घेतला जातो का? हा खरा संशोधनाचा विषय आहे.

भुदरगड नागरी, तपोवन व मानिनी पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या वेदना (‘मरणयातना ठेवीदारांच्या’) ‘लोकमत’ने मांडल्या होत्या. त्याची दखल घेऊन जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी पतसंस्था अवसायकांची मंगळवारी तातडीची बैठक बोलाविली आहे. पतसंस्थांच्या अवसायकांनी केलेल्या कामाचा आढावा ते घेणार आहेत. थकीत कर्जाची वसुली किती केली, वसुलीसाठी कोणती विशेष मोहीम राबविली, ठेवीदारांचे किती पैसे दिले, त्यामध्ये प्राधान्यक्रम कसा लावला, यासह विविध मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे.संस्थाचालकांचा उजळ माथा !कारभाºयांच्या प्रतापाने संस्था बुडाल्या आणि ठेवीदारांच्यावर उपासमारीची वेळ आली. लग्नकार्य, औषधपाण्यासाठी लोकांकडून उसने घेतलेले पैसे परत न गेल्याने त्यांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे; पण ज्यांनी ठेवीदारांना भिकेला लावले, ते कारभारी व त्यांचे कुटुंबीय सामाजिक व राजकीय क्षेत्रात उजळमाथ्याने फिरत आहेत. 

भुदरगडसह पाच पतसंस्थांच्या अवसायकांची मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. यामध्ये आढावा घेऊन ज्यांनी अपेक्षित काम केले नाही, त्यांच्याबाबत उचित कार्यवाही केली जाईल.- अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधकया संस्थांचा घेतला जाणार आढावाभुदरगड नागरी सहकारी पतसंस्था , मानिनी नागरी सहकारी पतसंस्था तपोवन सहकारी पतसंस्था बाबूराव महाजन राजीव नागरी पतसंस्था

टॅग्स :bankबँकkolhapurकोल्हापूर