शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

म्हासुर्लीचे तलाठी आणि राशिवडेचे मंडलाधिकारी निलंबित, जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 17:43 IST

तलाठ्यांनी नजरचुकीने दोन गुंठे ऐवजी २१ गुंठे क्षेत्र खरेदी घेणाऱ्याच्या नावावर केले. 

म्हासुर्ली : म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील गट क्रमांक ३४ मधील दोन गुंठे खरेदी पत्र असताना २१ गुंठे चा फेरफार व डायरी नोंद केल्याप्रकरणी म्हासुर्लीचे तलाठी विजय पाटील आणि राशिवडे मंडळ अधिकारी देविदास तरडे यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दोषी असल्याचा ठपका ठेवत अनिश्चित काळासाठी निलंबित केले. या प्रकारामुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, म्हासुर्ली येथील गट क्रमांक ३४ मधील दोन गुंठेजमीन जमीन मालकाने बांधाशेजारी बांध असणाऱ्या शेतकऱ्यास खरेदी पत्रान्वये विक्री केली. गट क्रमांक ३४ ची ऑनलाइन डायरी येताना त्यामध्ये अन्य गावातील चार चुकीच्या डायऱ्या आल्याने ही नोंदणी रद्द करून पुन्हा नव्याने डायरी करण्यात आली. मात्र तलाठी विजय पाटील यांनी नजरचुकीने दोन गुंठे ऐवजी २१ गुंठे क्षेत्र खरेदी घेणाऱ्याच्या नावावर केले. हे लक्षात येताच दोष दुरुस्तीचा प्रस्ताव तहसीलदार ऑफिसला सादर केला. दरम्यानच्या काळात म्हासुर्ली येथूनच प्रांताधिकारी कार्यालयाकडे या प्रकाराची तक्रार झाल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली. या प्रकाराची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गंभीर दखल घेत तुकडेबंदी कायद्याचा भंग आणि बेकायदेशीर काम केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. हा प्रकार नजरचुकीने तलाठी पाटील निलंबित झाल्याचे तसेच मंडलाधिकारी तरडे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे समजताच गट क्रमांक ३४ मधील खरेदी देणार आणि घेणार या दोघांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. हा प्रकार तलाठ्याकडून नजरचुकीने झाला असून आमचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे कोणावरही निलंबनाची कारवाई करू नये अशी विनंती एका निवेदनाद्वारे केली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कायद्याप्रमाणे सर्व व्यवस्थित होईल असे उत्तर दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी